शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये कोट्यवधींच्या कामांच्या पुस्तिका गहाळ

By admin | Updated: May 15, 2015 23:33 IST

सार्वजनिक बाधंकाम : ३,६४८ कामांत घोटाळ्यांची शक्यता विकास राऊत औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विविध कामांचे ३ हजार ६४८ मेजर बुक (काम मापक पुस्तिका) गहाळ झाले आहेत. साधारणपणे एका बुकमध्ये १ लाख ते १ कोटी रुपयांच्या कामांच्या नोंदी असतात. मेजरबुकचे रेकॉर्ड विभागाकडे नसल्यामुळे कोणत्या कामाचे कसे व किती बिल ...


सार्वजनिक बाधंकाम : ३,६४८ कामांत घोटाळ्यांची शक्यता
विकास राऊत
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विविध कामांचे ३ हजार ६४८ मेजर बुक (काम मापक पुस्तिका) गहाळ झाले आहेत. साधारणपणे एका बुकमध्ये १ लाख ते १ कोटी रुपयांच्या कामांच्या नोंदी असतात.
मेजरबुकचे रेकॉर्ड विभागाकडे नसल्यामुळे कोणत्या कामाचे कसे व किती बिल अदा केले गेले आहे, याचा लेखाजोखा लेखा विभागालाही सांगता येत नाही. दुष्काळ आणि पाणीटंचाईला जिल्हा सामोरा जात असतानाच सर्कलमध्ये झालेल्या कोट्यवधी कामांचे मेजर बुक बदली होऊन गेलेले अभियंते, कंत्राटदार यांनीच गायब केल्याची चर्चा आहे. सार्वजनिक बांधकाम उत्तर उपविभागातील सर्वाधिक ९७१ मेजरबुक गहाळ झाले आहेत. त्याखालोखाल उपविभाग क्र.१ मधील ८३७ मेजरबुक गहाळ आहेत.
सूत्रांच्या मते कनिष्ठ, शाखा अभियंता यांची बदली झाल्यास मेजर बुकची देवाण-घेवाण केली जाते. त्याची कुणालाही माहिती नसते. चुकून कंत्राटदाराच्या घरी मेजर बुक राहतात. मेजर बुक शोधण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. प्रत्येक विभागातील १ हजारपैकी ७०० मेजरबुक कार्यालयाबाहेर आहेत.
तर बिले देणे बंद...
सार्वजनिक बांधकाम औरंगाबाद विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी उपविभागांतर्गत येणार्‍या गहाळ मेजरबुकची यादी क्रमांकासह प्रकाशित केली आहे. गहाळ मोजमाप पुस्तिका ज्यांच्याकडे असतील त्यांनी ८ दिवसांत संबंधित उपविभागात जमा कराव्यात. गहाळ झालेल्या मोजमाप पुस्तिकांमधील देयके (बिल) रद्द समजण्यात येतील. भविष्यात त्यातील बिले दिली जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

उपविभागनिहाय गहाळ मेजर बुक
उत्तर उपविभाग- ९७१
दक्षिण उपविभाग- २९३
उपविभाग क्र.१ - ८३७
यांत्रिकी उपविभाग- १२३
फुलंब्री उपविभाग- २२६
सिल्लोड उपविभाग- ५५६
फर्दापूर उपविभाग- २७०
पैठण उपविभाग- ३७२
---------------------
एकूण३,६४८