जम्मू-काश्मीर, दि. 20 - जम्मू-काश्मीरमधील बनिहालमध्ये सशस्त्र सीमा दलाच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्यात एक जवान शहीद झाला असून एक जण जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामबन जिल्ह्यातील बनिहालमध्ये सशस्त्र सीमा दलाच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान शहीद झाल्याची आणि एक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, जखमी झालेल्या जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, सशस्त्र सीमा दलाच्या कॅम्पच्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.
दुसरीकडे, काश्मीर खोऱ्यात सुरक्षा रक्षकांनी दहशतवादविरोधी अभियान राबवताना बुधवारी हिजबुल मुजाहिद्दीनच्या आणखी एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. अनंतनाग येथील बीजबहाडा रेल्वे स्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेतले. तसेच, पोलिसांनी ओमपोरा येथे एक जिवंत बॉम्ब निकामी करीत एक मोठी दुर्घटना रोखण्यात यश मिळवले.