शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बुटावर 'ठाकूर' नावाचा उल्लेख, दुकानदार पोलिसांच्या ताब्यात

By महेश गलांडे | Updated: January 6, 2021 12:52 IST

बुलंदशहरच्या गुलावठी येथील ही घटना असून विशाल चौहान यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली होती. बुटाच्या सोलवर ठाकूर या नावाचा उल्लेख करण्यात आल्याचे विशाल यांनी पाहिले होते.

ठळक मुद्देबुलंदशहरच्या गुलावठी येथील ही घटना असून विशाल चौहान यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली होती. बुटाच्या सोलवर ठाकूर या नावाचा उल्लेख करण्यात आल्याचे विशाल यांनी पाहिले होते

लखनौ - उत्तर प्रदेशातील एका शूज विक्रेत्या दुकानदारावर पोलिसांनी कारवाई केली आहे. ठाकूर नावाच्या ब्रँडचे बूट विकल्याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर दुकानदारास ताब्यात घेण्यात आले आहे. बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. 

बुलंदशहरच्या गुलावठी येथील ही घटना असून विशाल चौहान यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली होती. बुटाच्या सोलवर ठाकूर या नावाचा उल्लेख करण्यात आल्याचे विशाल यांनी पाहिले होते. त्यानंतर, यातून जातीवाचक भावना दुखावल्या जात असल्याचं सांगत यास विरोध केला आहे. याबाबत माहिती मिळताच, मोठ्या प्रमाणात लोकं दुकानाबाहेर जमा झाले होते. दुकानदार मोहम्मद नासीर यांनी दुकानाबाहेर जमा झालेल्या नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. ठाकूर हा बुट विक्रीचा ब्रँड असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, विशाल चौहान यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामध्ये, दुकानदार आणि बूट बनविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून बजरंग दल कार्यकर्ते आणि दुकानदार यांच्यात शाब्दीक वाद निर्माण झाल्याचं दिसत आहे.   दरम्यान, आपल्या खासगी वाहनांवर अनेकदा गाडी मालकांकडून जातीचा किंवा धर्माचा उल्लेख केला जातो. तसेच, राजकीय पक्षाच्या नेत्यांचा आणि हटके स्टाईल नंबरप्लेट बनवून एक मेसेज देण्यात येतो. गाडीवरील नंबरवरुन त्या व्यक्तीची किंवा त्यांच्या समुदायाची ओळख दाखवून एक रुबाब दाखविण्यात येतो. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वीच गाडीवरही जातीवाचक नाव लिहिण्यास बंदी घातली आहे.

जातदर्शक नावाच्या वाहनांवरही कारवाईदुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या काचांवर जातीवाचक नावाचा उल्लेख केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, गाडीच्या नंबरप्लेटवरही नावाचा उल्लेख केल्यास संबधित गाडीमालकावर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात अतिरिक्त परिवहन आयुक्त मुकेश चंद्र यांनी राज्यातील सर्व आरटीओंना पत्र पाठवले होते. तसेच, अशा वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 

टॅग्स :lucknow-pcलखनऊCrime Newsगुन्हेगारी