शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

 मेघालयात काँग्रेसच्या एका आमदारासह चार आमदार भाजपा प्रवेशाच्या तयारीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2018 1:34 PM

मेघालयात काँग्रेसच्या अलेक्झांडर हेक यांच्यासह चार आमदार विधानसभेचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यावर्षी मार्च महिन्यामध्ये मेघालय विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत.

ठळक मुद्देया आमदारांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सांबोर शुल्लाई आणि जस्टीन दखर, रॉबिनस सिंगकोन या अपक्षांचा समावेश आहे.

शिलॉंग- मेघालयात काँग्रेसच्या अलेक्झांडर हेक यांच्यासह चार आमदार विधानसभेचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यावर्षी मार्च महिन्यामध्ये मेघालय विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. या आमदारांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सांबोर शुल्लाई आणि जस्टीन दखर, रॉबिनस सिंगकोन या अपक्षांचा समावेश आहे.आम्ही आज मंगळवारी मेघालय विधानसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश करणार आहोत अशी माहिती हेक यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. त्यानंतर होणाऱ्या सभेसाठी केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फोन्स उपस्थित राहाणार आहेत. अल्फोन्स भाजपाचे मेघालय राज्यप्रभारी आहेत. अल्फोन्स यांच्याबरोबर नॉर्थ इस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सचे समन्वयक हेमंत विश्वशर्मा तसेच इतर पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत.केंद्र आणि इतर राज्यामधील भाजपा व रालोआ सरकारचा उत्तम कारभार पाहून हे चार आमदार भाजपामध्ये येत असल्याचे पक्षाचे मेघालय प्रदेशाध्यक्ष शिबुन लिंगडोह यांनी सांगितले. अलेक्झांडर हेक मुकुल संगमा यांच्या कॅबिनेटमध्ये आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री होते. संगमा यांनी गेल्या वर्षी त्यांना कॅबिनेटमधून काढून टाकले होते. अलेक्झांडर कॉंग्रेसमध्ये जाण्यापुर्वी भाजपातर्फेच विधानसभेत निवडून जायचे. 1998, 2003, 2008 असे तीन वेळा ते भाजपाच्या तिकिटावर ते विधानसभेत निवडून गेले होते. 2009 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2013 साली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत प्रवेश केला.

टॅग्स :Indiaभारतcongressकाँग्रेसBJPभाजपा