मेघालयमधील पाच काॅंग्रेस आमदारांचा राजीनामा; मुकुल संगमांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 03:59 PM2017-12-29T15:59:29+5:302017-12-29T16:50:03+5:30

काॅंग्रेसपक्षाला मेघालयमध्ये मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या पाच आमदारांनी विधानसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देऊन पक्षसमोर नवे संकट उभे केले आहे.

Five Congress MLAs resign from Meghalaya; Pushing to Mukul Sangams | मेघालयमधील पाच काॅंग्रेस आमदारांचा राजीनामा; मुकुल संगमांना धक्का

मेघालयमधील पाच काॅंग्रेस आमदारांचा राजीनामा; मुकुल संगमांना धक्का

Next
ठळक मुद्देएकूण साठ सदस्यांच्या मेघालय विधानसभेमध्ये कॉंग्रेसचे 30 सदस्य आहेत. विधानसभेचा कार्यकाळ 6 मार्च रोजी संपणार असून पुढील वर्षी नागालॅंड आणि त्रिपुरा या राज्यांच्या निवडणुकांबरोबर मेघालय विधानसभेसाठीही निवडणूक होणार आहे. 

शिलॉंग- कॉंग्रेस पक्षाला मेघालयमध्ये मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या पाच आमदारांनी विधानसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देऊन पक्षासमोर नवे संकट उभे केले आहे. विशेष म्हणजे या पाच आमदारांमध्ये माजी उपमुख्यमंत्री रॉवेल लिंगडोह यांचा समावेश आहे. त्यांच्याबरोबर इतर तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे. या इतर तिघांमध्ये युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीच्या एका आमदाराचा व दोन अपक्षांचा समावेश आहे. या सर्वांनी आपले राजीनामे विधानसभेचे मुख्य सचिव अॅंड्र्यू सायमन्स यांच्याकडे सुपुर्द केले आहेत.

कालच कॉंग्रेसचे आमदार पी.एम. साइयाम यांनी राजीनामा दिला होता. सलग दोन दिवस चाललेल्या या राजीनामा सत्रामुळे विधानसभेत कॉंग्रेसचे आता केवळ 24 आमदार राहिले आहेत.कॉंग्रेसचे मेघालयातील ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री रॉवेल यांनी या राजीनाम्याबद्दल बोलताना नंतर सांगितले, "आज राजीनामा देणारे आठ आमदार पुढील आठवड्यामध्ये नॅशनल पिपल्स पार्टीमध्ये सहभागी होणार आहेत." एकूण साठ सदस्यांच्या मेघालय विधानसभेमध्ये कॉंग्रेसचे 30 सदस्य आहेत. विधानसभेचा कार्यकाळ 6 मार्च रोजी संपणार असून पुढील वर्षी नागालॅंड आणि त्रिपुरा या राज्यांच्या निवडणुकांबरोबर मेघालय विधानसभेसाठीही निवडणूक होणार आहे. 

आज राजीनामा दिलेल्या सदस्यांनी यापुर्वी मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्याविरोधात बंड केले होते. या पाच आमदारांमध्ये चार आमदार संगमा यांच्या कॅबिनेटमध्ये होते. मात्र त्यांना संगमा यांनी मंत्रिमंडळातून वगळले होते. या आठ जणांनी माझ्याकडे राजीनामे सादर केले आहेत असे विधानसभेचे प्रमुख सचिव अॅंड्र्यू सायमन्स यांनी सांगितले.
 

Web Title: Five Congress MLAs resign from Meghalaya; Pushing to Mukul Sangams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.