युवा कौशल्य दिनानिमित्त आज मेळावा

By Admin | Updated: July 15, 2015 00:15 IST2015-07-15T00:15:01+5:302015-07-15T00:15:01+5:30

सोलापूर: पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत नोकरी व प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगार प्रशिक्षण-पतपुरवठा या दोन्ही योजना जिल्‘ात सक्षमपणे राबविण्याच्या दृष्टीने उद्या (बुधवार) जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिर येथे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली तर खा. शरद बनसोडे यांच्या हस्ते एक दिवसीय मेळावा आयोजित केला आहे.

Meetings on the occasion of Youth Skills Day | युवा कौशल्य दिनानिमित्त आज मेळावा

युवा कौशल्य दिनानिमित्त आज मेळावा

लापूर: पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत नोकरी व प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगार प्रशिक्षण-पतपुरवठा या दोन्ही योजना जिल्‘ात सक्षमपणे राबविण्याच्या दृष्टीने उद्या (बुधवार) जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिर येथे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली तर खा. शरद बनसोडे यांच्या हस्ते एक दिवसीय मेळावा आयोजित केला आहे.
या मेळाव्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील सुमारे एक हजार युवक-युवती उपस्थित राहतील. त्यांना रोजगार तसेच प्रशिक्षण मिळावे यासाठीचे नियोजन या मेळाव्यात करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी नगरपालिका प्रशासन अधिकारी त्र्यंबक ढेंगळे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी जिल्‘ातील ११ तालुक्यात हा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणार्थी युवक-युवतींना अद्ययावत प्रशिक्षणाद्वारे विकसित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय गावसाने, नितीन कोळेकर, सी. एम. क्षीरसागर, राजू जाधव, शेटे, चंद्रकांत लोंढे, एम.एम. कुलकर्णी, राजशेखर शिंदे, प्रा. महेश आवटे, मेघराज भाले, ज्ञानेश्वर सुतार, एस. बी. गोसावी आदी अधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यासाठी जिल्‘ातील बेरोजगार युवक-युवतींनी आपल्या आधार कार्डसह हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी उपस्थित राहून आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे समन्वयक प्रमोद हिंगे यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Meetings on the occasion of Youth Skills Day