शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

डोवाल यांच्या निवासस्थानी बैठक; सलोखा राखण्याची धर्मगुरूंची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 04:23 IST

रामजन्मभूमीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात शांती व सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याची ग्वाही हिंदू व मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी रविवारी दिली.

नवी दिल्ली : रामजन्मभूमीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात शांती व सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याची ग्वाही हिंदू व मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी रविवारी दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या निवासस्थानी या धर्मगुरूंची एक बैठक पार पडली.या बैठकीला शियापंथीय मौलाना कब्ले जवाद, स्वामी चिदानंद सरस्वती, बाबा रामदेव आदी धर्मगुरु उपस्थित होते. बाबा रामदेव यांनी सांगितले की, देशातील शांती, सलोखा कायम राखण्यावर या बैठकीत एकमत झाले. रामजन्मभूमी निकालाच्या निमित्ताने वातावरण तापविण्याचा व हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न देशातील व देशाबाहेरील काही अपप्रवृत्तींकडून होण्याची शक्यता आहे याकडे या बैठकीत लक्ष वेधण्यात आले. अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी हिंदूंना मुस्लिमांनी व मशीद बांधण्यासाठी मुस्लिमांना हिंदूंनी सहकार्य केले पाहिजे असेही आवाहन यावेळी करण्यात आले. स्वामी चिदानंद सरस्वती म्हणाले की, भले दोन समुदाय एकाच स्थळी एकत्रितरित्या प्रार्थना करू शकणार नाहीत, मात्र आपल्या देशाच्या रक्षणासाठी दोघांनी एकत्र यायलाच हवे. राष्ट्रीय ऐक्य महत्त्वाचे आहे.>मोदी सरकारचे केले कौतुकमौलाना कल्बे जवाद यांनी सांगितले की, दोन्ही समुदायांच्या धर्मगुरूंच्या बैठकीत खेळीमेळीने चर्चा झाली. रामजन्मभूमी वादाचा संवेदनशील मुद्दा काळजीपूर्वक हाताळल्याबद्दल सर्वांनीच मोदी सरकारचे कौतुक केले.या बैठकीनंतर एका संयुक्त निवेदनात या धर्मगुरुंनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल सर्वांनी मान्य केला आहे. राष्ट्रीय हित सर्वात महत्त्वाचे असून ते जपण्यासाठी प्रयत्नशील राहाण्यावर या बैठकीत एकमत झाले.>निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना वाढीव सुरक्षानवी दिल्ली : रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादात ऐतिहासिक निकाल देणाºया सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांंसह पाच न्यायाधीशांच्या सुरक्षा व्यवस्थेत खबरदारीचा उपाय म्हणून वाढ करण्यात आली आहे.वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, कोणाही न्यायाधीशास धमकी आली म्हणून नव्हे तर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण व न्या. एस. अब्दुल नझीर यांनी शनिवारी सकाळी निकाल दिल्यानंतर लगेचच त्यांना वाढीव सुरक्षा लागू करण्यात आली आहे.आधी या न्यायाधीशांच्या निवासस्थानी स्थायी सुरक्षारक्षक होते. आता त्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. शिवाय निवासस्थानी जाण्याच्या रस्त्यावर बॅरिकेड लावण्यात आले असून, न्यायाधीशांना मोबाईल एस्कॉर्टही पुरविण्यात आला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर