हत्तीरोगाला आळा घालण्यासाठी औषधोपचार मोहीम

By Admin | Updated: December 19, 2014 22:56 IST2014-12-19T22:56:59+5:302014-12-19T22:56:59+5:30

Medicines campaign to prevent hepatitis | हत्तीरोगाला आळा घालण्यासाठी औषधोपचार मोहीम

हत्तीरोगाला आळा घालण्यासाठी औषधोपचार मोहीम

>नागपूर : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्र मांतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरात १४ ते १८ डिसेंबर या कालावधीत हत्तीरोग दुरीकरण सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात आली.
हत्तीरोगाचा प्रसार क्युलेक्स डासांमार्फ त होतो. ज्या व्यक्तीच्या शरीरात मायक्रोफायलेरिया या प्रकारचे जंतू असतात अशा व्यक्तीला क्युलेक्स डासांची मादी चावल्यास हे जंतू रक्तामाफंत डासांच्या शरीरात प्रवेश करतात. डासांच्या शरीरात या जंतूची वाढ होते. हा दूषित डास निरोगी माणसाला चावल्यास त्या व्यक्तीला हत्तीरोग होण्याची शक्यता असते. त्याची लक्षणे दिसू लागतात. त्यावर वेळीच उपाय करण्याची गरज असते. हा रोग बळावल्यानंतर उपाय नाही. परंतु हत्तीरोग होऊ नये, यासाठी डीईसी व अल्बडाझोल गोळ्याची मात्रा वयोगटानुसार वर्षातून एकदा घेतल्यास भविष्यात या रोगाची बाधा होत नाही. ही बाब विचारात घेता आरोग्य विभागातर्फे घरोघरी जाऊन गोळ्या वाटप करण्यात आले. तसेच विविध कार्यक्रम राबविण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Medicines campaign to prevent hepatitis