शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
5
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
6
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
7
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
8
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
11
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
12
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
13
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
14
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
15
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
19
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
20
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
Daily Top 2Weekly Top 5

औषधांना न जुमानणारा हिवतापाचा विषाणू

By admin | Updated: October 25, 2015 03:52 IST

भारतात डेंग्यू या रोगाच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले असतानाच आग्नेय आशियात औषधींना न जुमानणाऱ्या हिवतापाच्या विषाणूचा प्रसार झाला आहे.

नवी दिल्ली : भारतात डेंग्यू या रोगाच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले असतानाच आग्नेय आशियात औषधींना न जुमानणाऱ्या हिवतापाच्या विषाणूचा प्रसार झाला आहे. त्यामुळे औषधी विज्ञानासमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे.आग्नेय आशियात उद्भवलेला हा औषधी प्रतिरोधक विषाणू दक्षिण आफ्रिकेतील डासांनाही संक्रमित करू शकतो, असे एका संशोधनात आढळले आहे. अर्थात हा अभ्यास प्रयोगशाळेत करण्यात आला असून, या विषाणूचा जीवघेणा प्रसार प्रयोगशाळेच्या बाहेरही होऊ शकतो.तसे झाल्यास या विषाणूचे भयंकर परिणाम होऊ शकतात आणि लाखो लोकांचे जीवन धोक्यात येऊ शकते, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. हे संशोधन ‘नेचर कम्युनिकेशन’ मध्ये प्रसिद्ध झाले आहे.अमेरिकेच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅलर्जी अँड इन्फोक्शियस डिसीज’ने (एनआयएआयडी) यावर संशोधन केले आहे. या संस्थेतील एक डॉक्टर रिक फेयरहर्स्ट म्हणाले की, आग्नेय आशियात हिवतापाचे निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांना हे संशोधन फायद्याचे होईल.अर्थात असे होण्याची ही पहिलीच वेळ नाही. १९५० च्या दशकापासून आतापर्यंत वेळोवेळी नवीन औषधी विकसित करण्यात आली. या औषधीने या विषाणूंना रोखले होते. यावेळी नवीन विषाणू थायलंड-कंबोडिया सीमेवर जन्माला आला आणि जगभर त्याचा प्रसार झाला.जागतिक आरोग्य संघटनेच्या मते गेल्या १५ वर्षांत हिवतापाचे बळी जाणाऱ्यांची संख्या ६० टक्क्यांनी घटली असून, ६२ लाख रोग्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)