शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबदलीची दलाली वकिलाला भोवणार

By admin | Updated: December 30, 2016 01:49 IST

दिल्लीतील एका लॉ फर्ममधून १३ कोटी रुपये जप्त केल्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) वादग्रस्त वकील रोहित टंडन यांना अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील एका लॉ फर्ममधून १३ कोटी रुपये जप्त केल्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) वादग्रस्त वकील रोहित टंडन यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अधिकारी टंडन यांची चौकशी करत होते. मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत त्यांना बुधवारी रात्री अटक करण्यात आली त्यांना आता न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्यांना असा संशय आहे की, कोलकाताचे व्यापारी पारसमल लोढा यांच्याशी हातमिळवणी करुन ६० कोटी रुपयांच्या बाद नोटा बदलण्यासाठी रोहित टंडनने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. याच प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून दिल्लीचे कोटक बँकेचे व्यवस्थापक आशीष कुमार यांनाही अटक करण्यात आली होती. नोटाबंदीनंतर काळ्या पैशांशी संबंधित काही जणांना या तपास संस्थेने ताब्यात घेतले आहे. सीबीआयने चेन्नईतून रेड्डी यांना अटक केली. तर, ईडीने लोढा आणि आशीष कुमार यांना अटक केली होती. दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा आणि आयकर विभाग यांनी याच महिन्यात दिल्लीत एका लॉ फर्ममधून १३.६ कोटी रुपये जप्त केले होते. या रकमेतील तब्बल दोन कोटी ६० लाख रुपयांच्या नव्या चलनातील नोटा होत्या. ईडीने या प्रकरणात मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. रेड्डी यांचे प्रकरण चेन्नईचे आहे. यात आयकर खात्याने १४२ कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेचा शोध लावला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)लोढांच्या लॉकरमधून हिरे, माणिक केले जप्त- अटक करण्यात आलेले व्यापारी पारसमल लोढा यांच्याविरुद्धच्या मोहिमेला गती देत सक्तवसुली संचालयाने (ईडी) कोलकात्यातून कथितरित्या लोढा यांच्या बँक लॉकरमधून हीरे, माणिक, दागिने जप्त केले. अलीपूर रोडवरील एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेतील लॉकर ईडीच्या अधिकाऱ्यांनी उघडले.- कोलकात्यातील दोन अन्य बँकातील लोढाचे दोन बँक लॉकर उघडले जाणे बाकी आहे. एजन्सीने २७ डिसेंबर रोजी कोलकात्यातून लोढा यांच्या दोन जागांवर तपास सुरु केला होता. मंगळवारी तपासात या एजन्सीला कथितरित्या स्विस बँकेशी संबंधित काही दस्तऐवज मिळाले होते. - एका महिलेच्या नावावर हे खाते आहे. रोहित टंडन आणि चेन्नईतील के. जे. शेखर रेड्डी यांच्या कंपनीतून मोठ्या संख्येने नव्या नोटा सापडल्याच्या प्रकरणात लोढाला अटक करण्यात आली आहे. एजन्सीने असा दावा केला आहे की, जुन्या नोटा बदलून देण्यासाठी लोढा १५ ते २० टक्के कमिशन घेत होता. लोढा याने कबूल केले आहे की, त्यांनी २५ कोटी रुपये जुन्या नोटांच्या बदल्यात बदलून दिले आहेत.