शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

Anshuman Singh : "आधी सिम काढलं, मग ATM ब्लॉक केलं"; शहीद अंशुमन यांच्या आई-वडिलांचे सुनेवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 08:22 IST

Anshuman Singh : सियाचीन आगीच्या घटनेत शहीद झालेल्या कॅप्टन अंशुमन यांच्या आई-वडिलांनी आपल्या सुनेवर गंभीर आरोप केले आहेत.

सियाचीन आगीच्या घटनेत शहीद झालेल्या कॅप्टन अंशुमन यांच्या आई-वडिलांनी आपल्या सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या हौतात्म्यानंतर त्यांची सून (स्मृती सिंह) हिने मुलाचं एटीएम कार्ड, जे त्याने आईला वापरण्यासाठी दिलं होतं ते ब्लॉक केलं आहे. तसेच कुटुंब वापरत असलेलं पोस्टपेड सिमही प्रीपेडमध्ये बदलण्यात आलं. कॅप्टन अंशुमन यांच्या आईने दावा केला आहे की, तिने आपल्या सुनेला कधी भांडी देखील घासायला दिली नाही, जेणेकरून तिचे हात खराब होऊ नये.

अंशुमन यांच्या वडिलांनी 'आज तक'शी बोलताना सांगितलं की, "संपूर्ण कुटुंबाकडे अंशुमनच्या नावावर एक सिम होतं जे पोस्टपेड होतं. सुनेने कुटुंबातील सदस्यांना बेसिक सिम काढून टाकलं आणि ते पोस्टपेडवरून प्रीपेडमध्ये बदललं. आम्ही कंपनीला फोन केला असता आम्हाला ते बंद झाल्याचं कळलं. तेव्हाही आम्ही विचार केला, हरकत नाही. यानंतर, माझी पत्नी वापरत असलेलं एटीएम देखील आठ तारखेला ब्लॉक करण्यात आलं. हे एटीएम अंशुमनच्या बँक अकाऊंटचं होतं. त्याने ते आधीच आईला दिलं होतं."

वडिलांनी पुढे सांगितले की, अंशुमन सिंह याचं त्याच्या आईसोबत इतकं अनमोल नातं होतं की समाजात असं उदाहरण सापडणार नाही. संपूर्ण कुटुंबाशी त्याचं घट्ट नातं होतं. घरी आल्यावर त्याला आईच्याच हातचं जेवण लागायचं. जेव्हा मी सुनेच्या वडिलांना विचारलं, आमच्याकडून काय चूक झाली ते मला सांगा? तर यावर ते म्हणाले की, आम्हाला आमचं मागील आयुष्य विसरायचं आहे. त्यावर आम्ही उत्तर दिलं की आमच्यासाठी तो जीवनाचा एक भाग आहे, तुमच्यासाठी तो भूतकाळ असेल पण आमच्यासाठी वर्तमान आणि भविष्य तोच आहे. 

अंशुमन यांच्या आईने टीव्ही 9 भारतवर्षशी बोलताना सांगितलं की, मी माझ्या सुनेला कधीही भांडीही घासायला सांगितली नाहीत. मी चार महिने नोएडामध्ये राहिले, तिथे मी तिला सांगत असे की तू भांडी नको घासू, तुझे हात खराब होतील. लग्नाआधी जेव्हा मुलगा मला सुनेबद्दल सांगायचा तेव्हा मी त्याला म्हणायचे की, ही खूप गोड आहे. त्यावेळी मी खूप आनंदी होती. मी स्वत: आपल्या सुनेला स्वयंपाक करून खायला देईन असं ही म्हटलं होतं. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान