बसवेश्वर मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापकास मारहाण शिक्षिका, शिपाई असलेल्या बहिणींचा प्रताप

By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:09+5:302015-04-13T23:53:09+5:30

सोलापूर :

Married mistress of the Basaveshwar Marathi Vidyalaya's teacher, Pratap of sisters | बसवेश्वर मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापकास मारहाण शिक्षिका, शिपाई असलेल्या बहिणींचा प्रताप

बसवेश्वर मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापकास मारहाण शिक्षिका, शिपाई असलेल्या बहिणींचा प्रताप

लापूर :
वेळेत का येत नाही ? असा जाब विचारणारे प्रभारी मुख्याध्यापक सूर्यकांत मल्लिकार्जुन चिकलंडे (वय 52, रा. भवानीपेठ, सोलापूर) यांना शिपाई आणि शिक्षिका असलेल्या लाड भगिनींनी मारहाण करीत त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. कस्तुरबा मंडई भागात असलेल्या र्शी बसवेश्वर मराठी विद्यालयात आज (सोमवारी) सकाळी पावणेआठ वाजता हा प्रकार घडला.
संस्थेचे एक संचालक असलेल्यांच्या दोन मुली या शाळेत कार्यरत आहेत. माधुरी हरिहर लाड या शिक्षिका तर वैशाली हरिहर लाड या शिपाई म्हणून नोकरीस आहेत. शिपाई असलेल्या वैशाली या शाळेत वेळेवर येत नाहीत. त्यामुळे शाळेची वेळेवर स्वच्छता होत नाही. सोमवारी नेहमीप्रमाणे वैशाली या उशिराच आल्या. प्रभारी मुख्याध्यापक चिकलंडे यांनी त्याचा जाब विचारताच वैशाली आणि त्यांची बहीण माधुरी यांनी त्यांना धक्काबुक्की करीत मारहाण केली. एवढय़ावरच न थांबता दोघींनी त्यांच्या हातातील मोबाईलही हिसकावून घेत हजेरी पत्रकही फाडून टाकले. जखमी अवस्थेत अमोलकुमार गिरी यांनी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. सिव्हिल पोलीस चौकीतील पोलिसांना गिरी यांनी घटनेची माहिती दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Married mistress of the Basaveshwar Marathi Vidyalaya's teacher, Pratap of sisters