शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Maratha Reservation : अभ्यासासाठी थोडा वेळ द्या, राष्ट्रपतींचं संभाजीराजेंससह खासदारांना आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 8:41 PM

Maratha Reservation : संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींच्या भेटीनंतर आपली पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 'आम्ही सविस्तर पद्धतीने आमची बाजू मांडली. सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी सविस्तरपणे ऐकून घेतली आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना पोहोचवण्यासाठी आज खासदार संभाजीराजेंनी राष्ट्रपतींची भेट घेतली.

नवी दिल्ली - मराठाआरक्षणावरून गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठाआरक्षण रद्द केल्यानंतर पुन्हा एकदा यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मराठा आरक्षणप्रश्नी भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यावेळी, राज्यातील चारही पक्षाचे प्रमुख खासदार त्यांच्यासमेवत होते. राष्ट्रपतींनीही त्यांची बाजू पूर्णपणे ऐकून घेतली. 

संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींच्या भेटीनंतर आपली पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 'आम्ही सविस्तर पद्धतीने आमची बाजू मांडली. सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी सविस्तरपणे ऐकून घेतली आहे. राजर्षी शाहू हे आरक्षणाचे जनक असे उद्गार राष्ट्रपतींनीही काढले. दुर्गम आणि दूरवर भागात राहणाऱ्या लोकांसाठी आरक्षण असा जो कायद्यात शब्द आहे. तो बदलण्याची विनंती या भेटी दरम्यान केली. "मी तुमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतले आहे. मला या विषयी अभ्यासासाठी थोडासा वेळ द्या", असं राष्ट्रपती म्हणाल्याचे संभाजीराजेंनी सांगितलं.   मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना पोहोचवण्यासाठी आज खासदार संभाजीराजेंनी राष्ट्रपतींची भेट घेतली. या भेटीकरिता संभाजीराजेंनी चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवसेना खासदार विनायक राऊत व आमदार संग्राम थोपटे हे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. 

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संभाजीराजे सुरूवातीपासून आक्रमक असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही स्तरवर त्यांना प्रयत्न सुरु केले. मराठा आरक्षणासाठी न्यायलयीन लढाईनंतर आता आंदोलन देखील सुरु करण्यात आली आहेत. मराठा आरक्षणासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत, अशी संभाजीराजे यांची भूमिका आहे.  

टॅग्स :marathaमराठाreservationआरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRamnath Kovindरामनाथ कोविंद