शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहनसिंग यांना ‘क्लीन चिट’

By admin | Updated: September 28, 2015 23:47 IST

कोळसा खाणपट्टे वाटप घोटाळ्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा सहभाग असल्याबद्दलचे कोणतेही पुरावे नाहीत, असे सांगत सीबीआयने मंगळवारी

नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टे वाटप घोटाळ्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा सहभाग असल्याबद्दलचे कोणतेही पुरावे नाहीत, असे सांगत सीबीआयने मंगळवारी मनमोहनसिंग आणि अन्य दोघांना अतिरिक्त आरोपी म्हणून न्यायालयात बोलावण्याची मागणी करणाऱ्या याचिकेचा विशेष सीबीआय न्यायालयात विरोध केला.झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांनी ही याचिका दाखल केली आहे. कोडा यांची ही याचिका ‘गुणवत्ता रहित’ आहे, असे सीबीआयने स्पष्ट केले. ‘त्यावेळी कोळसा मंत्रीही असलेले मनमोहनसिंग हे जिंदल समूहाच्या कंपनीला कोळसा खाणपट्टा वाटप करण्याच्या कटात सामील असल्याचे उपलब्ध दस्तऐवजांवरून सकृतदर्शनीदेखील वाटत नाही, असे विशेष सरकारी वकील आर. एस. चीमा यांनी विशेष सीबीआय न्यायाधीश भरत पाराशर यांच्या न्यायालयात सांगितले.मनमोहनसिंग यांच्यासोबतच अन्य दोन व्यक्तींनाही आरोपी म्हणून न्यायालयात बोलावण्याच्या कोडा यांच्या मागणीवर बोलताना चीमा म्हणाले, हे दोघे जण महत्त्वपूर्ण फिर्यादी साक्षीदार आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेत त्यांनी कुणासोबत कट रचला होता, असे दर्शविणारा पुरावा उपलब्ध नाही. न्या. पाराशर यांनी हा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोडा यांच्या याचिकेवरील आपला निर्णय १६ आॅक्टोबरपर्यंत सुरक्षित ठेवला. (लोकमत न्यूज नेटवर्क)---------ही याचिका विद्यमान खटल्याला केवळ विलंब लावण्यासाठीच नव्हे तर न्यायालयाचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी आरोपीने योजलेली एक युक्ती आहे, असे नमूद करून चीमा म्हणाले, सीबीआयने या प्रकरणाचा सर्वंकष आणि संपूर्ण तपास केला आहे आणि या प्रकरणात मनमोहनसिंग यांना आरोपी म्हणून न्यायालयात बोलावण्याला कारण ठरू शकेल, असा कोणताही पुरावा सीबीआयला आढळला नाही. सिंग यांना न्यायालयात बोलावले पाहिजे, असे दस्तऐवजांवरूनही सकृतदर्शनी वाटत नाही.