मणिपूरमध्ये दोन स्कूल बसचा भीषण अपघात, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर अनेक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 15:25 IST2022-12-21T15:07:30+5:302022-12-21T15:25:32+5:30
अनेक विद्यार्थी गंभीर जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे

मणिपूरमध्ये दोन स्कूल बसचा भीषण अपघात, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर अनेक जखमी
इंफाळ: मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात बुधवारी ट्रीपवर फिरायला जाणाऱ्या दोन स्कूल बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बस थंबलानू उच्च माध्यमिक विद्यालय, याईरीपोकची होती आणि खौपूमकडे जात होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी नोनी जिल्ह्यातील बिसनुपूर-खौपुम (जुना काचार रस्ता) येथे अभ्यास दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या दोन बसचा अपघात झाला. या अपघातात बस उलट्या कोसळल्या. प्राथमिक माहितीनुसार, यात 15 मुलांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.
ही मुले खौपुमच्या दिशेने जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थ्यांना बिष्णुपूर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून इम्फाळमधील राज मेडिसिटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेची माहती मिळाल्यानंतर बवाच पथक तात्काळ रवाना झाले. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.