शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांच्या वाढदिवसाला मनेका गांधींकडून ‘माखन कटोरी’ भेट

By admin | Updated: September 27, 2015 05:20 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ६५ व्या वाढदिवशी केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांच्याकडून एक विशेष भेट मिळाली आहे

पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ६५ व्या वाढदिवशी केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांच्याकडून एक विशेष भेट मिळाली आहे. ही भेटवस्तू खरोखरच अनोखी आहे. ती अतिशय दुर्मिळ असल्याने मोदींच्या वाढदिवशी ती देता येईल की नाही याची खुद्द मनेकांनाही शाश्वती नव्हती. त्यामुळे तिचा आधीपासूनच शोध घेण्यात आला आणि शेवटी डेहराडून येथे ती सापडली. मनेका गांधी यांनी पंतप्रधानांना दिलेली ही अनोखी भेट म्हणजे पौराणिकदृष्ट्या महत्त्व असलेले आणि पवित्र मानले जाणारे ‘माखन कटोरी’ किंवा ‘फिकस कृष्णा’ नावाच्या वृक्षाचे रोपटे होय.गेल्या १७ सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस होता. ‘माखन कटोरी’ हे दुर्मिळ झाड असल्याने ते मोदींच्या वाढदिवशी उपलब्ध झाले नाही. परंतु उशिरा का होईना मनेका गांधी यांनी या झाडाचे रोपटे पंतप्रधानांना भेट दिले. ते रोपटे आता पंतप्रधानांच्या नवी दिल्लीतील ७, रेसकोर्स मार्ग या निवासस्थानी असलेल्या उद्यानात लावण्यात येईल, अशी आशा आहे.या झाडाचा पौराणिक संबंध असल्याने त्याला माखन कटोरी हे नाव पडले आहे. भगवान कृष्णाला बालपणी लोणी खूप आवडायचे. ते वृंदावन येथील घरांमधून नेहमी लोणी चोरून आणायचे आणि या चोरीबद्दल आई यशोदा बालकृष्णाला रागवायची. चोरी सापडली की आई रागावणार म्हणून कृष्ण हे चोरलेले लोणी एका झाडाच्या पानात गुंडाळून लपवून ठेवत असे. कालांतराने या झाडाच्या पानांनी पेल्याचा आकार घेतला आणि तेव्हापासून या झाडालाच ‘माखन कटोरी’ असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. ‘फिकस कृष्णा’ हे या झाडाचे जैविक नाव आहे. (वृत्तसंस्था)