शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

तब्बल 13 वर्ष सुट्टीविना काम; अखंड सेवेचा होणार सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 10:23 AM

सुट्टी घ्यावी लागणार असल्यानं पुरस्कार सोहळ्याला अनुपस्थित राहणार

शिमला : हिमाचल प्रदेशच्या परिवहन विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं तब्बल 13 वर्षांपासून एकही सुट्टी घेतलेली नाही. हिमाचल प्रदेश परिवहन निगममध्ये सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्याचं नाव जोगिंदर सिंह असं आहे. जोगिंदर हिमाचल प्रदेश परिवहन विभागात वाहक म्हणून काम करतात. या सेवेबद्दल सिरसोर कला संगम नावाची एक संस्था जोगिंदर यांचा सन्मान करणार आहे.  जोगिंदर सिंह यांच्या अखंड सेवेचा 28 जून रोजी सन्मान करण्यात येणार आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, जोगिंदर सन्मान सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहेत. त्यांनी याबद्दलची माहिती संस्थेला दिली आहे. सन्मान सोहळ्याला उपस्थित राहायचं असल्यास सुट्टी घ्यावी लागेल, म्हणून जोगिंदर या सोहळ्याला जाणार नाहीत. त्यांच्याऐवजी त्यांचे वडिल पुरस्कार स्वीकारणार आहेत. 'डॉ. यशवंत सिंह परमार पुरस्कार स्वीकारण्यासाठी माझे वडील जातील,' अशी माहिती जोगिंदर यांनी दिली. जोगिंदर सिंह यांनी 4 जून 2005 पासून हिमाचल प्रदेशच्या परिवहन विभागात नोकरी करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी एकही सुट्टी घेतलेली नाही. जोगिंदर सणांच्या दिवशीही त्यांचं कर्तव्य बजावतात. रविवारी मिळणारी सुट्टीदेखील त्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात 303 सुट्ट्या जमा झाल्या आहेत. त्यांनी या सर्व सुट्ट्या हिमाचल प्रदेश परिवहन विभागाला परत केल्या आहेत. त्यांच्या या सेवेचा परिवहन विभागानं 2011 मध्ये सन्मान केला होता.  

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश