बंगालमध्ये ५०हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून ममता बॅनर्जी यांचा संताप; ‘हा उच्च पातळीवरून होत असलेला राजकीय हस्तक्षेप’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:10 IST2026-03-20T13:10:31+5:302026-03-20T13:10:44+5:30

कोणतीही पूर्वसूचना न देता या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.

Mamata Banerjee's anger over transfers of over 50 officers in Bengal; 'This is political interference from the highest levels' | बंगालमध्ये ५०हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून ममता बॅनर्जी यांचा संताप; ‘हा उच्च पातळीवरून होत असलेला राजकीय हस्तक्षेप’ 

बंगालमध्ये ५०हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून ममता बॅनर्जी यांचा संताप; ‘हा उच्च पातळीवरून होत असलेला राजकीय हस्तक्षेप’ 

कोलकाता : प. बंगालमध्ये राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी ५० हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उच्च स्तरावरून होत असलेला हा राजकीय हस्तक्षेप असल्याची टीका केली. कोणतीही पूर्वसूचना न देता या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी इच्छुक -
पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिल्यास  बहरामपूरमधून निवडणूक लढवण्यास आपण तयार आहोत, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे.

सुवेंदूंचा प्रचारास प्रारंभ 
विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी गुरुवारी दक्षिण कोलकातामधील अत्यंत चुरशीच्या भवानीपूर मतदारसंघात भाजपच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. या जागेवर त्यांची लढत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी होत आहे. त्यांनी येथे एक सभाही घेतली. 

भाजपची दुसरी यादी जाहीर
भाजपने राज्य विधानसभेसाठी १११ उमेदवारांची दुसरी यादी गुरुवारी जाहीर केली. यात महाभारतात द्रौपदीची भूमिका करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री रूपा गांगुली यांच्या नावाचा समावेश आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या लहान बंधूंनाही उमेदवारी देण्यात आली आहे. 

दरम्यान, आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात अत्याचार व हत्या झालेल्या पीडितेच्या मातेने भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. २४-परगणा जिल्ह्यात पनिवाटी मतदारसंघातून त्यांना तिकीट दिले जाऊ शकते. हा मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचा आहे.

Web Title : बंगाल में अधिकारियों के तबादलों पर ममता बनर्जी नाराज, बताया राजनीतिक हस्तक्षेप

Web Summary : ममता बनर्जी ने बंगाल में चुनाव से पहले अधिकारियों के तबादलों की आलोचना की। कांग्रेस नेता अधीर रंजन चौधरी चुनाव लड़ सकते हैं। सुवेंदु अधिकारी ने भवानीपुर में प्रचार शुरू किया। भाजपा ने दूसरी सूची जारी की, वहीं एक पीड़िता की मां भाजपा से चुनाव लड़ना चाहती हैं।

Web Title : Mamata Banerjee Angered by Bengal Transfers, Calls it Political Interference.

Web Summary : Mamata Banerjee criticizes Bengal officer transfers as political interference before elections. Congress leader Adhir Ranjan Chowdhury may contest. Suvendu Adhikari started campaigning in Bhawanipore. BJP released its second list, while a victim's mother wants to contest for BJP.