Make Rahul Gandhi Congress President again; Strong demand from MPs | राहुल गांधींना पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनवा; खासदारांची जोरदार मागणी

राहुल गांधींना पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनवा; खासदारांची जोरदार मागणी

काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा खासदार राहुल गांधींना अध्यक्ष बनविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आज अध्यक्षा सोनिया गांधींसोबत झालेल्या बैठकीत खासदारांनी पुन्हा  ही मागणी लावून धरली होती. 


काँग्रेसच्या खासदारांची झूम कॉलवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अध्यक्षा सोनिया गांधी देखिल होत्या. या बैठकीत देशातील सध्या कोरोना महामारीमुळे झालेली परिस्थिती आणि भविष्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक खासदारांनी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनविण्याची मागणी केली. आता राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा हाती घ्यावी, असे हे खासदार म्हणाले. 


या बैठकीला के सुरेश, एके अँटोनी, मणिकम टागोर, अब्दुल खालिद, गौरव गोगोई यांच्यासह अन्य खासदारांनी राहुल यांना अध्यक्ष करण्याची मागणी केली. गेल्या काही काळापासून त्यांना पुन्हा अध्यक्षपद सोपवावे, अशी मागणी होत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीदेखील काँग्रेसच्या कार्य समितीसमोर ही मागणी केली होती. यानंतर अन्य नेत्यांनी याचे समर्थन केले होते. 


लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर काँग्रेस हरली होती. यामुळे तेव्हा काँग्रेस अध्यक्ष असलेल्या राहुल यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता. यानंतर प्रियंका गांधी यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र, सोनिया गांधी यांनीच पुन्हा अध्यक्षपद स्विकारले होते. त्या काळात राहुल गांधी यांचे मन वळविण्याचे प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी केले होते. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचे कोरोनामुळे निधन

हद्द झाली! अनुकंपाखाली नोकरी दिली नाही; लॉकडाऊनमध्ये तरुणाने SBI ची हुबेहूब शाखाच उघडली

मोठा दिलासा! पुन्हा पुन्हा वापरता येणार N95 मास्क; केवळ 90 मिनिटांत 'चक्र डिकोव्ह' करणार निर्जंतुक

अमेरिका की आशिया, 'विश्वयुद्ध 2020' भडकल्यास कोण भिडतील? तज्ज्ञांनी लावले अंदाज

Ganeshotsav 2020 : यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करणार? सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

राजस्थानमध्ये घोडेबाजार, संकटात गेहलोत सरकार?; भाजपाच्या दोन नेत्यांना अटक

चीननेच कोरोनाची माहिती लपविली, WHO ही साथीला! आरोप करणाऱ्या महिला सायंटिस्टचे पलायन

परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार

भारताने फोडले, अमेरिकेने घेरले! घाबरलेला चीन रशियाला शरण गेला

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Make Rahul Gandhi Congress President again; Strong demand from MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.