Good news! IIT-Delhi develops device to disinfect N-95 masks in 90 minutes | मोठा दिलासा! पुन्हा पुन्हा वापरता येणार N95 मास्क; केवळ 90 मिनिटांत 'चक्र डिकोव्ह' करणार निर्जंतुक

मोठा दिलासा! पुन्हा पुन्हा वापरता येणार N95 मास्क; केवळ 90 मिनिटांत 'चक्र डिकोव्ह' करणार निर्जंतुक

कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यासाठी N95 मास्क हे एक मोठे शस्त्र म्हणून काम करत आहे. या मास्कवरील अवलंबित्व, किंमत आणि बाजारातील उपलब्धता पाहता आयएएन-फंडच्या सहयोगातून आयआयटी दिल्लीने एक यंत्र तयार केले आहे. जे या एकदाच वापरात येणाऱ्या N95 मास्कला पुन्हा पुन्हा वापरण्या लायक बनविणार आहे. केवळ 90 मिनिटांत हे मास्क पुनर्वापरासाठी मिळणार आहे. 


आयआयटी दिल्लीच्या इनक्यूबेटेड क्लीनटेक स्टार्टअप चक्रने चक्र डिकोव्ह नावाने हे डिव्हाईस विकसित केले आहे. यामध्ये हे मास्क पुन्हा वापरण्यासाठी सुरक्षित पद्धतीने निर्जंतुक केले जाणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी शुक्रवारी हे चक्र डी-कोव हे यंत्र लाँच केले. याची स्तुती करताना मंत्र्यांनी या नव्या शोधाबद्दल आयआयटी दिल्लीचे अभिनंदनही केले आहे. 


चक्र डिकोव्ह हे अशावेळी बाजारात येणार आहे जेव्हा देश कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. अशावेळी कोरोनाला रोखण्यासाठी लढा आणखी तीव्र करण्याची गरज भासू लागली आहे. एन-95 मास्कचा दुसऱ्यांदा वापर करण्यासाठी असुरक्षित आहे. यामुळे हे मास्क आरोग्य कर्मचाऱ्यांचे आयुष्य धोक्यात घालू शकते. 

तसेच हे मास्क फेकल्यास बायोमेडिकल वेस्ट वाढते. यामुळे व्हायरसचे संक्रमन आणि पर्यावरणाची हानी याचा विचार करून दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी हे यंत्र वनविले आहे. हे यंत्र परवडणारे असून केवळ 90 मिनिटांत हे मास्क पुनर्वापरासाठी मिळणार आहे. 

कसे आहे हे डिव्हाईस?
एका छोट्या बॉक्सच्या आकाराचे हे डिव्हाईस असून यामध्ये इनोव्हेटिव डिकंटेमिनेशन मॅकेनिझमसोबत बनविण्यात आले आहे. जो एन-95 मास्कच्या अत्यंत छोट्या छोट्या छिद्रांची स्वच्छता करतो. यासाठी ओझोन गॅस वापरण्यात आला आहे. हा ओझोन गॅस या प्रणालीद्वारे अत्यंत मोठ्या दाबाने सूक्ष्म छिद्रांवर मारा करतो आणि सुरक्षितता देतो. ओझोन हा एक प्रबळ ऑक्सिडायझिंग वायू आहे. जो प्रोटीन कोटच्या माध्यमातून व्हायरसला नष्ट करतो. या यंत्रामध्ये एकदा का एन 95 मास्क निर्जंतुक झाले की ते पुन्हा 10 वेळा वापरता येणार आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

अमेरिका की आशिया, 'विश्वयुद्ध 2020' भडकल्यास कोण भिडतील? तज्ज्ञांनी लावले अंदाज

Ganeshotsav 2020 : यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करणार? सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

राजस्थानमध्ये घोडेबाजार, संकटात गेहलोत सरकार?; भाजपाच्या दोन नेत्यांना अटक

चीननेच कोरोनाची माहिती लपविली, WHO ही साथीला! आरोप करणाऱ्या महिला सायंटिस्टचे पलायन

परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार

भारताने फोडले, अमेरिकेने घेरले! घाबरलेला चीन रशियाला शरण गेला

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Good news! IIT-Delhi develops device to disinfect N-95 masks in 90 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.