Horse trading in Rajasthan, Gehlot government in crisis?; Two BJP leaders arrested | राजस्थानमध्ये घोडेबाजार, संकटात गेहलोत सरकार?; भाजपाच्या दोन नेत्यांना अटक

राजस्थानमध्ये घोडेबाजार, संकटात गेहलोत सरकार?; भाजपाच्या दोन नेत्यांना अटक

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी भाजपाच्या दोन नेत्यांना मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले असून चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली आहे. 


राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ने त्यांना ताब्यात घेतले आहे. गेहलोत सरकार पाडण्यासाठी आमदारांचा घोडेबाजार करत असल्याच्या आरोपाखाली ब्यावरच्या दोन भाजप नेत्यांचे नाव समोर आले आहे. भरत मालानी आणि अशोक सिंह अशी या नेत्यांची नावे आहेत. त्याना ब्यावर उदयपूरच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने अटक केली आहे. मालानी यांच्या कॉल रेकॉर्डिंगवरून आमदारांचा घोडेबाजार केला जात असल्याचे समजले, असे या पथकाने म्हटले आहे. 


सध्या या दोन्ही नेत्यांची जयपूरमध्ये चौकशी सुरु आहे. भरत मालानी यांनी राजस्थान भाजपामध्ये मोठमोठ्या पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. राजस्थान सरकार पाडण्यासाठी कट रचल्याच्या आरोपाखाली एसओजीने गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार काही फोन रेकॉर्डिंग वरून अशोक गेहलोत सरकार पाडण्यासाठी कट रचला जात आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये वाद सुरु आहेत, असे पसरविले जात आहे. यामुळे काही जण अपक्ष आणि काँग्रेसच्या आमदारांना फोडून सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहेत. 
भाजपाचे नेते आमदारांना यासाठी पैशांचे लालच दाखवत आहेत आणि आपल्या बाजुला करण्याचा प्रयत्न करत आहेत. राजस्थान स्पेशल ऑपरेशन ग्रुप या प्रकरणाचा तपास करत आहे. 


गेहलोत यांचा टोला
या प्रकरणानंतर एका पत्रकार परिषदेमध्ये गेहलोत यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसमध्येच गटबाजी सुरु आहे का या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री कोणाला व्हावे असे वाटत नाहीय? पण उपमुख्यमंत्र्यांसोबत वाद अजिबात नाहीय, असे म्हटले. 
एसओजीने आमदारांच्या खरेदीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उप मुख्यमंत्री सचिन पायलट आणि महेश जोशी यांनी जबाब नोंदविण्यासाठी बोलावले आहे. 19 जूनला झालेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या आमदारांना पैशांचे प्रलोभन दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याची चौकशी एसओजीकडे देण्यात आली होती. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

चीननेच कोरोनाची माहिती लपविली, WHO ही साथीला! आरोप करणाऱ्या महिला सायंटिस्टचे पलायन

परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार

भारताने फोडले, अमेरिकेने घेरले! घाबरलेला चीन रशियाला शरण गेला

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Horse trading in Rajasthan, Gehlot government in crisis?; Two BJP leaders arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.