शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
2
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
3
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
4
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
5
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
6
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
7
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
8
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
9
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
10
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
11
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
12
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
13
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
14
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
15
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
16
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
17
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
18
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
19
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
20
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
Daily Top 2Weekly Top 5

देशाची वाटचाल 'मेक इन इंडिया'पासून 'रेप इन इंडिया'कडे; काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 13:59 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक मुद्द्यावर बोलतात, मात्र महिलांच्या विरोधातील अत्याचाराबाबत मोदी गप्प बसले आहेत.

नवी दिल्ली - देशात वाढणारे महिला अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांवरुन काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. लोकसभेत आज काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सरकारवर टीका करताना भाजपाने ज्या भारताची ओळख मेक इन इंडिया सांगितली होती तो भारत आता रेप इन इंडियाच्या दिशेने वाटचाल करतोय अशा कडक शब्दात भाष्य केलं. 

मंगळवारी लोकसभेत काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक मुद्द्यावर बोलतात, मात्र महिलांच्या विरोधातील अत्याचाराबाबत मोदी गप्प बसले आहेत. भारत मेक इन इंडियापासून रेप इन इंडियाच्या दिशेने जातोय असं त्यांनी सांगितले. यापूर्वीही अधीर रंजन चौधरी यांनी महिला मुद्द्यावर भाष्य करताना लोकसभेत म्हटलं होतं की, एकीकडे देशात रामाचं मंदिर बनविले जातंय तर दुसरीकडे सीतामातेला जाळण्याचं काम होतंय. उन्नाव आणि हैदराबाद बलात्काराच्या घटनेवर त्यांनी महिला सुरक्षेचा मुद्दा लोकसभेत उचलला होता. 

तसेच लोकसभेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अधीर रंजन चौधरी यांच्या शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली. काश्मीरमधील परिस्थितीवर चर्चेदरम्यान हे चित्र पाहायला मिळालं. अमित शहा म्हणाले की, काश्मीरमधील परिस्थिती सर्वसामान्य आहे. आम्हाला सांगितलं जातं की, स्थिती खराब होऊ शकते. रक्त सांडू शकते. मात्र असं काहीही घडलं नाही. काश्मीरात एकही गोळी चालली नाही. ९९.५ टक्के विद्यार्थी परीक्षेत सहभागी झालेत, ७ लाख रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सर्व पोलीस ठाण्यात व्यवस्थित काम सुरु आहे. पंचायत समितीच्या निवडणुकाही व्यवस्थित पार पडल्या असल्याची माहिती शहांनी लोकसभेत दिली. 

दरम्यान, शुक्रवारी अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पलटवार केला होता. काँग्रेसने महिला सन्मानाचा विषय धर्माशी जोडणं चुकीचं आहे. यापूर्वी मी असं कधी पाहिले नाही. बंगाल पंचायत निवडणुकीत बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून वापरलं जातं. बंगालमधील एक खासदार आज मंदिराचं नाव घेतात. ज्यांनी बलात्काराचा राजकीय फायद्यासाठी वापर केला ते भाषण देतायेत. उन्नाव असेल वा तेलंगणा ज्या घटना घडल्या ते दुर्दैवी आहेत. दोषींनी फाशी मिळायला हवी पण त्यावर राजकारण करु नका असं त्यांनी सांगितलं होतं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRapeबलात्कारcongressकाँग्रेसAmit Shahअमित शहाJammu Kashmirजम्मू-काश्मीर