शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

अरबी समुद्रात मोठी कारवाई! अमेरिकेने बॅन केलेले इराणचे ३ तेल टँकर्स मुंबईत जप्त; आंतरराष्ट्रीय तस्करीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 17:35 IST

भारताने इराणशी संबंधित तीन तेल टँकर जहाजे जप्त केली आहेत.

Indian Coast Guard: भारताने आंतरराष्ट्रीय तेल तस्करी आणि बेकायदेशीर व्यापाराविरोधात आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय तटरक्षक दलाने  मुंबई किनारपट्टीपासून १०० नॉटिकल मैल दूर अरबी समुद्रात संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन तेल टँकर्सना जप्त केले. ही तिन्ही जहाजे अमेरिकेने प्रतिबंधित केलेल्या यादीतील असून त्यांचा संबंध इराणशी असल्याचे उघड झाले आहे.

६ फेब्रुवारी रोजी भारतीय तपास यंत्रणांना भारताच्या क्षेत्रात काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. मुंबईपासून साधारण १०० सागरी मैल पश्चिमेला हे तीन टँकर्स एकमेकांमध्ये तेल हस्तांतरण करत असल्याचे निदर्शनास आले. ही पद्धत सहसा तेलाचा मूळ स्रोत लपवण्यासाठी वापरली जाते. तटरक्षक दलाने तातडीने कारवाई करत या तिन्ही जहाजांना ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी मुंबई बंदरात आणले.

स्टेलर रूबी या जहाजावर इराणचा झेंडा होता. तर एस्फाल्ट स्टार हे जहाज मुख्यत्वे चीनच्या समुद्री मार्गावर सक्रिय होते. अल जाफझिया या जहाजाने २०२५ मध्ये इराणमधून जिबूतीपर्यंत इंधन नेल्याची नोंद आहे.

ओळख लपवण्यासाठी कॅमेलिअन पद्धत

हे तिन्ही जहाजे शैडो फ्लीट म्हणून काम करत होती. तपासणीत असे समोर आले की, ही जहाजे पकडले जाऊ नये म्हणून वारंवार आपली ओळख, नाव आणि कोणत्या देशाचा झेंडा लावायचा, हे बदलत असत. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने ज्या आयएमओ क्रमांकाच्या जहाजांवर बंदी घातली होती, तेच क्रमांक या जप्त केलेल्या जहाजांशी जुळत आहेत.

इराणचा संबंधांपासून नकार

दुसरीकडे, इराणच्या नॅशनल इराणी ऑईल कंपनीने या प्रकरणातून हात झटकले आहेत. जप्त करण्यात आलेली जहाजे किंवा त्यातील तेलसाठा आमचा नाही, असा दावा इराणने केला आहे. मात्र, शिपिंग डेटा आणि अमेरिकन इंटेलिजन्सनुसार या जहाजांचे धागेदोरे इराणशीच जुळलेले आहेत.

समुद्रात हाय अलर्ट; ५५ जहाजे तैनात

भारताची ही कारवाई अत्यंत महत्त्वाच्या वेळी झाली आहे. ज्या दिवशी भारत आणि अमेरिकेने अंतरिम व्यापार करारावर स्वाक्षरी केली, त्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. भारताच्या समुद्री हद्दीचा वापर बेकायदेशीर कृत्यांसाठी होऊ नये, यासाठी ५५ जहाजे आणि १० ते १२ विमाने २४ तास गस्त घालत आहेत.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Oil Tankers Seized in Mumbai; International Smuggling Exposed

Web Summary : Indian Coast Guard seized three Iranian oil tankers near Mumbai for illegal oil transfer. The ships, linked to Iran and sanctioned by the US, were using deceptive tactics to hide their origin. India heightened maritime security after the seizure.
टॅग्स :MumbaiमुंबईIranइराणSeaसमुद्र