शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
2
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
3
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
केंब्रिजमधून M. Phi, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
5
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
6
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
7
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
8
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
9
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
10
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
11
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
12
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
13
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
14
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
16
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण

... मग २०२२ मध्ये येणाऱ्या कुंभमेळ्याला २०२१ मध्ये सरकारनं परवानगी का दिली?; आव्हाडांनी उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 2:10 PM

Kumbhmela : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला प्रश्न

ठळक मुद्देराज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला प्रश्नयापर्वी अनेकांनी यावर टीका करत व्यक्त केली होती नाराजी

देशात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव असतानाच आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यावरून राजकीय नेत्यांसह अनेक कलाकार मंडळींनीही टीका करत नाराजी दर्शवली होती. कुंभमेळ्यादरम्यान अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची माहितीही समोर आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रातिनिधीक स्वरूपात आयोजित करण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान, आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे."कुंभ मेळ्याचं आयोजन दर १२ वर्षांनंतर केलं जातं. यानुसार कुंभ मेळा २०२२ मध्ये आयोजित झाला पाहिजे होता. असं असताना केंद्र आणि राज्य सरकारनं २०२१ मध्ये हा कुंभमेळा आयोजित करण्याची परवानगी कशी दिली? आता त्यांनी मृत्यूंची आणि कोरोनाचा प्रसार झाल्याची जबाबदारी स्वीकारावी," असं आव्हाड म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर प्रश्न उपस्थितीत केला आहे.  यासोबतच जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक ट्वीट करत नेपाळचे पूर्वीचे राजे ज्ञानेंद्र वीर विक्रम शाह देव आणि राणी कोमल यांना कोरोनाची लागण झाली असल्याचंही म्हटलं. ते महा कुंभमेळ्याला उपस्थित होते असंही त्यांनी म्हटलं आहे. कुंभमेळा व्हायला नको होता - सोनू निगम"मी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल बोलणार नाही. पण  मी हिंदू कुटुंबात जन्मलोय. हिंदू या नात्याने म्हणू शकतो की, कुंभमेळा व्हायलाच नको होता. देवाची कृपा की, आत्ता केवळ सांकेतिक झाला आहे. हा श्रद्धेचा मुद्दा आहे मान्य आहे. पण संपूर्ण जगात सध्या जी काही स्थिती आहे, ती बघता लोकांचा जीव अधिक महत्त्वाचा आहे. अशाकाळात  शो सुद्धा व्हायला नकोत. कुठलाही शो सोशल डिस्टंसिंगचे पालन करून व्हायला हवा. पण तूर्तास नाहीच," असे सोनू निगमनं एका व्हिडीओद्वारे म्हटलं होतं.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाMaharashtraमहाराष्ट्रJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या