Join us  

Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 10:52 AM

Sara Tendulkar : सारानं आता कोरियन स्कीन केअर ब्रँडची ॲम्बेसेडर म्हणून ब्युटी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची कन्या सारा तेंडुलकर हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. २०२१ मध्ये तिनं प्रतिष्ठित ब्रँड सेल्फ-पोर्टेटसाठी एका कॅम्पेनमध्ये सहभागी होऊन मॉडलिंग क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. आता सारानं प्रसिद्ध कोरियन स्कीन केअर ब्रँड लानेजची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून ब्युटी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं आहे. 

सारानं लानेजचे प्रॉडक्ट वापरतानाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिनं आपल्या कोलॅबरेशनची घोषणा केली. "लानेजसोबत जोडलं जाऊन आनंद झाला आहे. हा एक असा ब्रँड आहे ज्याच्या इनोव्हेशनबाबतच्या समर्पणासाठी मी दीर्घकाळापासून प्रशंसा करते. त्यांच्यासोबत एकत्र येणं माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे," असं तिनं म्हटलंय. 

 

सोशल मीडियावर चर्चेत 

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. शुभमन गिल याच्यासोबत तिचं नाव जोडलं जातं. सोशल मीडियावर त्यांच्या अफेअयरच्या चर्चा वारंवार चालू असतात. सारा तेंडुलकरचा डिपफेकही व्हायरल झाला होता. त्यामध्ये सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल असल्याचं भासवण्यात आलं होतं. त्यावर सारा तेंडुलकरनं संताप केला होता. तसंच असं कृत्य करणाऱ्यांना सुनावलं होतं. सारा तेंडुलकर क्रिकेट सामने पाहण्यासाठी अनेकदा क्रिकेट स्टेडियममध्ये हजर असते.  

टॅग्स :सारा तेंडुलकर