शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

“लोकनेते अजित पवारांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक अन् दुःखद”: पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:38 IST

Deputy CM Ajit Pawar Passed Away: बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले.

Deputy CM Ajit Pawar Passed Away: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा घेण्यासाठी अजित पवार मुंबईहून बारामती येथे जात होते. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी बारामती विमानतळाजवळ उतरताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विमानाला मोठी आग लागली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शोकसागरात बुडाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून बारामती विमान अपघाताबाबत माहिती घेतली होती. अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला.

एक्सवर एक ट्विट करत पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य कार्यकर्त्यांप्रति शोकसंवेदना. ॐ शांती., असे पंतप्रधान मोदी यांनी शोक संदेशात म्हटले आहे. 

संपूर्ण एनडीए शोकाकुल पवार कुटुंबासोबत खंबीरपणे उभे

आज, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे ज्येष्ठ एनडीए सहकारी अजित पवार यांचे एका दुःखद अपघातात निधन झाल्याच्या बातमीने मला खूप दुःख झाले आहे. गेल्या साडेतीन दशकांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी अजित पवार यांनी केलेले समर्पण शब्दात व्यक्त करता येणार नाही. आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा ते महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर दीर्घ चर्चा करत असत. त्यांचे निधन हे माझे तसेच एनडीए कुटुंबाचे वैयक्तिक नुकसान आहे. मी पवार कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या वेळी, संपूर्ण एनडीए शोकाकुल पवार कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. ओम शांती शांती शांती, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

अजित पवार यांचा मृत्यू दुर्दैवी

अजित पवार यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. ते राजकारणात माझे जवळचे मित्र होते आणि आमचे कौटुंबिक संबंधही होते. त्यांचे निधन ही एक मोठी हानी आहे. पक्षाच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, अशी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

अजित पवारांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहप्रवाशांचे विमान अपघातात निधन झाल्याची माहिती अत्यंत वेदनादायक आहे. या कठीण, दुःखद प्रसंगी महाराष्ट्राच्या जनतेसोबत आहे. संपूर्ण पवार कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करतो, असे काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनावर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी शोक व्यक्त केला. मी संपूर्ण पवार कुटुंब आणि त्यांच्या समर्थकांप्रति शोक व्यक्त करते. मी अजित पवार यांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळे यांच्याशी बोलले आहे.

एक अनुभवी राजकारणी म्हणून स्मरणात राहतील

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शोक व्यक्त करताना म्हटले की, विमान अपघातात अजित पवार यांच्या दुःखद निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी आहे. हे एका अशा नेत्याचे अकाली निधन आहे, ज्यांच्यासमोर एक दीर्घ आणि उज्ज्वल राजकीय कारकीर्द होती. या कठीण प्रसंगी शोकाकुल कुटुंब ज्या अपार दुःखातून जात असेल, ते व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. मी संपूर्ण पवार कुटुंब, त्यांचे समर्थक आणि हितचिंतकांना माझ्या संवेदना व्यक्त करतो. महाराष्ट्राच्या जनतेची विविध घटनात्मक पदांवरून सेवा केलेले अजित पवार हे एक अनुभवी राजकारणी म्हणून स्मरणात राहतील, ज्यांनी आपल्या लोकांप्रति आपली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि कौशल्याने पार पाडली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूवर द्रमुकचे प्रवक्ते टी.के.एस. एलंगोवन म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. कदाचित नागरी विमान वाहतूक तज्ञ यावर अहवाल जारी करतील. पण हे देशाचे मोठे नुकसान आहे... मी त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.

 

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi: Ajit Pawar's untimely demise shocking and painful.

Web Summary : Deputy CM Ajit Pawar tragically died in a plane crash near Baramati. PM Modi and other leaders expressed grief. Pawar was respected for his grassroots connection and dedication to Maharashtra's people. The NDA stands with the Pawar family.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहNCPराष्ट्रवादी काँग्रेसPlane Crashविमान दुर्घटनाRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Chopraप्रियंका चोप्राMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNitin Gadkariनितीन गडकरीNitin Gadkariनितीन गडकरी