स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल बनल्या कमला, महाकुंभमेळ्यातह सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 12:07 IST2025-01-13T12:06:14+5:302025-01-13T12:07:42+5:30
Mahakumbhmela 2025: ॲपल कंपनीचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल ह्या सहभागी होणार आहेत. दरम्यान, स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांनी कमला हे हिंदू नाव धारण केलं आहे. तसेच त्यांच्या गुरूंनी आपलं गोत्र प्रदान केलं आहे.

स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल बनल्या कमला, महाकुंभमेळ्यातह सहभागी होणार
हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा असलेल्या महाकुंभमेळ्याला प्रयागराज येथे आजपासून सुरुवात झाली आहे. या महाकुंभमेळ्यामध्ये ॲपल कंपनीचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल ह्या सहभागी होणार आहेत. दरम्यान, स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांनी कमला हे हिंदू नाव धारण केलं आहे. तसेच त्यांच्या गुरूंनी आपलं गोत्र प्रदान केलं आहे.
लॉरेन पॉवेल यांच्या भारत दौऱ्याबाबत माहिती देताना त्यांचे आध्यात्मिक गुरू स्वामी कैलाशानंदजी महाराज यांनी सांगितले की, आम्ही लॉरेन पॉवेल यांना कमला हे हिंदू नाव दिलं आहे. त्या इथे आपल्या गुरुजींना भेटण्यासाठी येणार आहेत. आम्ही त्यांचं कमला असं नामकरण केलं आहे. त्या आमच्यासाठी मुलीसारख्या आहेत. त्या दुसऱ्यांदा भारताल आल्या आहेत. त्या खाजगी कार्यक्रमासाठी आल्या असून, त्या काही दिवस येथे प्रवास करतील.
स्वामी कैलाशानंद महाराज यांनी पुढे सांगितले की, लॉरेन पॉवेल यांना त्यांच्या गुरूचं गोत्र मिळाल्यानंतर त्यांना कमला हे नवं नाव देण्यात आलं आहे. लॉरेन पॉवेल यांना सनातन धर्मामध्ये रुची आहे. तसेच त्यांना अच्युत हे गोत्र देण्यात आलं आहे. लॉरेन ह्या ध्यान धारण करण्यासाठी भारतात आल्या आहेत. जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील सदस्यांपैकी एक असलेल्या लॉरेन ह्या कुंभमेळ्यादरम्यान त्या संन्याशाप्रमाणे राहतील. तसेच त्या अमृत स्नान आणि मौनी अमावस्येदरम्यान, त्या स्नान करतील.
लॉरेन पॉवेल ह्या सध्या वाराणसीमध्ये आहेत. तसेच त्या महाकुंभमेळ्याच्या पहिल्या दिवशी प्रयागराज येथे पोहोचणार आहेत. त्या त्यांचे गुरू आणि निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी कैलाानंद यांच्या शिबिरात राहतील. तसेच २९ जानेवारीपर्यंत कुंभमेळ्यातील विविध विधींपर्यंत सहभागी होतील.