शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बडोदा बँकेत महाघोटाळा

By admin | Updated: October 10, 2015 03:03 IST

देशांतर्गत आणि बाहेरील काळ्या पैशावर मोठमोठे दावे करणाऱ्या मोदी सरकारला शुक्रवारी जबरदस्त धक्का बसला. सरकारी उपक्रम असलेल्या बँक आॅफ बडोदाच्या एका शाखेत

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीदेशांतर्गत आणि बाहेरील काळ्या पैशावर मोठमोठे दावे करणाऱ्या मोदी सरकारला शुक्रवारी जबरदस्त धक्का बसला. सरकारी उपक्रम असलेल्या बँक आॅफ बडोदाच्या एका शाखेत अंकेक्षण अहवालात वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यावरही सरकार निद्राधिन राहिले आणि आयातीच्या नावावर बनावट कंपन्यांच्या माध्यमाने ६ हजार १७२ कोटी रुपये हाँगकाँगला पाठविण्यात आले. ही देवाणघेवाण मोदी सरकार सत्तेत आल्यावर जून-जुलै २०१४ मध्ये झाल्याचा आरोप काँग्रेसने शुक्रवारी हा आॅडीट अहवाल उघड करताना केला. एवढी मोठी रक्कम बँकेत पॅन क्रमांकाशिवाय रोख जमा करण्यात आली आणि त्याच दिवशी त्या खात्यांमधून ही रक्कम विदेशी खात्यात वळती झाली,असाही दावा या पक्षाने केला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आर.पी.एन.सिंग यांच्या सांगण्यानुसार सरकारमधील एका बड्या नेत्याच्या इशाऱ्यावरुन ही देवाणघेवाण सुरु होती. सिंग यांनी भाजपाच्या या नेत्याचे नाव उघड केले नसले तरी पुराव्यादाखल दस्तावेज सादर करुन ६,१७२ कोटीची ही रक्कम कुठलीही औपचारिकता पूर्ण केल्याशिवाय देशाबाहेर गेल्याचे सिद्ध केले. बँकेच्या आॅडिट रिपोर्टमध्ये कंपन्यांची नावे,खाते संख्या, जमा करण्यात आलेली रोख रक्कम,विदेशी चलनात देशाबाहेर गेलेली रक्कम याची इत्यंभूत माहिती आहे. परंतु या घोटाळ्यात अद्याप कुठलाही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. कारवाईच्या नावावर एक व्यवस्थापक आणि त्याच्या एका सहकाऱ्यास तेवढे निलंबित करण्यात आले. यावर आक्षेप घेत सरकारला घोटाळ्याची कल्पना असताना एफआयआर का नोंदविण्यात आला नाही? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. दोषींच्या बचावासाठीच गुन्हा नोंदविण्याचे टाळण्यात आले,असाही आरोप या पक्षाने केला. पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी यासंदर्भात तथ्यांची माहिती द्यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.खातेदारांचे पत्ते बनावटअचानक ५९ कंपन्यांची नवी खाती उघडण्यात येतात,त्यात मोठी रक्कम जमा होते आणि त्वरित ती आयातीच्या नावावर विदेशी खात्यांमध्ये हस्तांतरित होते, ही आश्चर्याची बाब आहे. ज्यांच्या नावावर ही खाती उघडण्यात आली त्यांचे पत्तेही बनावट होते. केवायसीशिवाय खाती कशी उघडली? आणि असे करण्यासाठी बँकेवर कुणी दबाव आणला हे उघड झाले पाहिजे. आमच्या कारकिर्दीत एकही घोटाळा झाला नाही,असा दावा पंतप्रधान मोदी सर्वत्र करीत असतात. व्यापमं आणि ललित मोदीप्रकरणाचा विचार बाजूला ठेवला तरी या बँक घोटाळ्याचे काय?असा सवाल काँग्रेसने केला आहे. सर्व काही माहिती असतानाही सीबीआय,सीबीडीटीसह इतर संस्थांना याप्रकरणाच्या तपासाचे आदेश का देण्यात आले नाहीत, एफआयआर का नोंदविण्यात आला नाही हे पंतप्रधानांनी सांगावे,अशी मागणी काँग्रेसने केली आहे.