उपराज्यपाल नजीब जंगही ४२०

By Admin | Updated: August 31, 2016 04:11 IST2016-08-31T04:11:38+5:302016-08-31T04:11:38+5:30

राज्यसभा सदस्य आणि भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आता दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे मोर्चा वळविला आहे.

Lt Governor Najib Jung 420 | उपराज्यपाल नजीब जंगही ४२०

उपराज्यपाल नजीब जंगही ४२०

नवी दिल्ली : राज्यसभा सदस्य आणि भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आता दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे मोर्चा वळविला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जंग यांना नेहमीच लक्ष्य करतात. मात्र, आता त्यांना भाजपा नेत्याने लक्ष्य केले आहे.
जंग राष्ट्रीय राजधानीचा कारभार चालविण्यास पात्र नाहीत, असे स्वामी यांचे म्हणणे आहे. यापूर्वी स्वामी यांनी टिष्ट्वटरवरून रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर टीका करून त्यांना लक्ष्य करीत आले आहेत. स्वामींनी आता टिष्ट्वट केले की, ‘माझ्या मते नजीब जंग दिल्लीचा गाडा हाकण्यास सक्षम नाहीत. ते केजरीवालांप्रमाणेच ४२० आहेत. आम्हाला दिल्लीत एखादा संघाचा माणूस पाहिजे. स्वामी यांनी यापूर्वीही जंग यांच्यावर हल्ला केला आहे. जंग यांची काँग्रेसच्या कार्यकाळात नायब राज्यपालपदी वर्णी लागली होती. केंद्रात मोदी सरकार आल्यावर अनेक राज्यपालांना पदावरून दूर सारण्यात आले. जंग खुर्ची वाचविण्यात यशस्वी झाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Lt Governor Najib Jung 420