शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

"तरुण मुलगा गमावण्याचं दुःख मला माहितीये"; 'त्या' २५ कामगारांच्या कुटुंबाला सांत्वन देताना अनिल अग्रवाल झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 17:47 IST

वेदांत प्लांट अपघातात गुन्हा दाखल झाल्यावर अनिल अग्रवाल यांनी आपली बाजू मांडली आहे.

Anil Agarwal Chhattisgarh Boiler Blast: "काळ कठीण असतो म्हणतात, याचा अनुभव मी गेल्या काही महिन्यांपासून घेत आहे. वर्षाच्या सुरुवातीला मी माझा तरुण मुलगा अग्निवेश याला गमावलं आणि आता १४ एप्रिलला छत्तीसगडच्या प्लांटमध्ये झालेल्या अपघाताने माझे २५ अनमोल सोबती माझ्यापासून हिरावून नेले," अशा शब्दांत वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जबाबदारी महारत्न कंपनीकडे होती, तरी घात झाला

छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यातील सिंघीतराई पॉवर प्लांटमध्ये १४ एप्रिल रोजी भीषण स्फोट झाला होता. या अपघातावर स्पष्टीकरण देताना अग्रवाल म्हणाले की, या प्लांटच्या देखभालीची आणि संचालनाची संपूर्ण जबाबदारी देशातील सर्वात विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या NTPC-GE च्या भागीदारीतील एनजीएसएल कंपनीला देण्यात आली होती.

अग्रवाल यांनी एक उदाहरण देत म्हटले की, "हे अगदी तसंच आहे, जसं एखादा गाडीचा मालक आपली गाडी एका अनुभवी ड्रायव्हरच्या हाती सोपवतो आणि तो नियमांचे पालन करेल या विश्वासावर निश्चिंत राहतो. आम्हीही तसाच विश्वास टाकला होता, तज्ज्ञ त्यांचे होते, कर्मचारी त्यांचे होते, तरीही हा दुर्दैवी अपघात घडला. होणाऱ्या गोष्टींवर कोणाचीच पकड नसते, पण वेदांत परिवार या संकटकाळात पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि यापुढेही शक्य ती सर्व मदत करेल."

काय होता नेमका अपघात?

१४ एप्रिल रोजी अथेना पॉवर प्लांटमध्ये बॉयलरमधून टर्बाईनकडे हाय-प्रेशर वाफ नेणाऱ्या पाईपचा भीषण स्फोट झाला होता. या दुर्घटनेत २५ कामगारांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर भाजले होते. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, इंधनाचा साठा आणि अतिरिक्त दाब निर्माण झाल्यामुळे हा स्फोट झाला होता.

या भीषण दुर्घटनेनंतर वेदांत समूहाने मृतांच्या नातेवाईकांना ३५ लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे, तर जखमींना १५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, या प्रकरणात छत्तीसगड पोलिसांनी अनिल अग्रवाल आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. देखभालीत निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.

उद्योजकांकडून पाठिंबा

दरम्यान, या प्रकरणात उद्योगपती नवीन जिंदाल यांनी अनिल अग्रवाल यांना पाठिंबा दिला आहे. "एखाद्या घटनेची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आणि पुराव्यांशिवाय थेट अध्यक्षांवर जबाबदारी ढकलणे योग्य नाही," असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Anil Agarwal Distraught Over Loss; Consoles Workers' Families

Web Summary : Vedanta's Anil Agarwal, grieving his son's death, expressed sorrow over the Chhattisgarh plant accident that killed 25 workers. He assured support to the families, despite outsourcing plant operations. An FIR has been filed against Agarwal, while Jindal voiced support.
टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडAccidentअपघातbusinessव्यवसाय