शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

सुरतमध्ये भाजप उमेदवार बिनविरोध; काँग्रेस म्हणते, ही तर ‘मॅच फिक्सिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 06:55 IST

निकालावरून वादंग; काँग्रेसचे नीलेश कुंभाणींचा अर्ज बाद ठरल्यानंतर पर्यायी उमेदवाराचा अर्ज केला रद्द; निवडणुकीतून आठ जणांची माघार

सुरत : छाननीवेळी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर अन्य उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने सुरतचे भाजप उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ पारधी यांनी दलाल यांच्या विजयाची घोषणा करत त्यांना प्रमाणपत्र दिले. 

ही मॅच फिक्सिंग आहे. काँग्रेसच्या कुंभाणी यांचा अर्ज बाद केल्यानंतर आयोगाने काँग्रेसचे पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचाही अर्ज बाद केला. सूरतमधील रोषाला भाजप घाबरल्याने अशी मॅच फिक्सिंग केले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे जयराम रमेश यांनी केला.गुजरातमधील सर्व २६ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान आहे. त्यासाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. सुरत मतदारसंघातील बसपाचे प्यारेलाल भारती, तीन छोटे पक्ष व चार अपक्षांनी आपला अर्ज मागे घेतला. 

तत्पूर्वी छाननीवेळी कॉंग्रेसचे नीलेश कुंभाणी यांच्या अर्जावरील सूचकांच्या स्वाक्षरी बनावट आढळल्याने अर्ज बाद ठरविला होता. कुंभाणी यांच्याऐवजी डमी उमेदवार असलेले सुरेश पडसाला यांचाही अर्ज बाद झाला होता. त्यामुळे भाजपचे मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले. त्यामुळे गुजरातमध्ये आता केवळ २५ जागांसाठी मतदान होईल.

कोर्टात आव्हान देणार : कॉंग्रेसकॉंग्रेस उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा अर्ज भाजपच्या सांगण्यावरून रद्द करण्यात आला आहे. त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी यावर टीका केली आहे. 

९ खासदार पोटनिवडणुकीत विजयीआतापर्यंत बिनविरोध निवडून आलेले बहुतांश खासदार सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले आहेत. तर समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांच्यासह ९ जण पोटनिवडणुकीत बिनविरोध विजयी झाले आहेत. 

आजवरच्या निवडणुकीत ३५ खासदार बिनविरोध१९५१ पासून आजवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण ३५ खासदार बिनविरोध निवडणूक आले आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने तथा अर्ज मागे घेतल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते. यापूर्वी २०१२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव या उत्तर प्रदेशच्या कन्नौजमधून बिनविरोध निवडून आल्या होत्या. लोकसभेसोबतच सुरू असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचे १० आमदार बिनविरोध विजयी ठरले.

बिनविरोध निवडून आलेले प्रमुख नेतेयशवंतराव चव्हाण, फारूख अब्दुल्ला, एच. के. माहताब, टी. टी. कृष्णमाचारी, पी. एम. सईद, एस. सी. जमीर हे प्रत्यक्ष निवडणूक न लढविताही थेट लोकसभेत पोहोचले होते. त्यापैकी सिक्कीम व श्रीनगरमधील उमेदवार दोनवेळा बिनविरोध विजयी झाले होते. 

टॅग्स :surat-pcसूरतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसgujarat lok sabha election 2024गुजरात लोकसभा निवडणूक निकाल २०२४