शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

लोकसभा निवडणुकीत भाजपनं उघडलं विजयाचं खातं; इतर सर्व उमेदवारांची माघार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 16:04 IST

Surat Lok Sabha Seat: गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने विजयाचे खाते उघडले आहे.

Lok Sabha Elections 2024: सर्वत्र लोकसभा निवडणूक २०२४ चे वारे वाहत असताना गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने विजयाचे खाते उघडले आहे. सूरतची जागा बिनविरोध जिंकण्यात सत्ताधारी पक्षाला यश आले असून, भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा खासदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खरे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठही उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक आयोगाकडून याची घोषणा केली जाईल. सूरत येथील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्याने समीकरणे बदलली होती. तर बसपाचे उमेदवार प्यारे लाल भारती यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.

दरम्यान, बिनविरोध निवड झालेले मुकेश दलाल हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. सूरतच्या जागेवरून प्रथमच एखादा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. इतर सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे दलाल यांचा विजय निश्चित झाला. निवडणूक आयोगाकडून दलाल यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली जाईल. आता गुजरातच्या २५ जागांसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांनी उच्च न्यायालयात याप्रकरणी धाव घेतली आहे, मात्र अद्याप कोणतीही अपडेट समोर आली नाही. अशा स्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने मुकेश दलाल विजयी झाले आहेत. 

दरम्यान, मागील वेळी गुजरातमधील सर्व २६ जागा जिंकण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले होते. काँग्रेसला तेव्हा एकही जागा जिंकता आली नव्हती. सूरतमध्ये काँग्रेसचे उमेदवार कुंभानी आणि इतर उमेदवारांचे अर्ज रद्द झाल्याने घडामोडींना वेग आला. त्यानंतर मुकेश दलाल बिनविरोध निवडून येतील अशी चर्चा सुरू होती. पण, तरीदेखील दलाल प्रचारात व्यग्र राहिले. बिनविरोध विजयी होण्याच्या प्रश्नावर त्यांनी ७ मेपर्यंत जनतेत राहून प्रचार करणार असल्याचे म्हटले होते. 

मुकेश दलाल हे सूरत भाजपचे महासचिव असून, ते सूरत महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिले आहेत. यापूर्वी त्यांनी भाजप युवा मोर्चाचे राज्यस्तरावर काम केले आहे. मुकेश दलाल हे तीनवेळा नगरसेवक, पाचवेळा स्थायी समिती अध्यक्ष राहिले असून गुजरात भाजप अध्यक्ष श्रीआर पाटील यांचे निकटवर्तीय अशीही त्यांची ओळख आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसSuratसूरत