शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लालूंचा नवा प्रयोग झाला फेल, दोन नवे चेहरे वगळता कन्या राेहिणीसह सर्वांचा झाला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 06:00 IST

Lok Sabha Election Result 2024:: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा करिष्मा कामी आला नाही. आरजेडीने बक्सरमधून सुधाकर सिंह आणि औरंगाबादमधून अभय कुशवाह हे नवे चेहरे उतरवले होते. हे दोघे वगळता सर्वच नव्या चेहऱ्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

- एस. पी. सिन्हापाटणा - २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा करिष्मा कामी आला नाही. आरजेडीने बक्सरमधून सुधाकर सिंह आणि औरंगाबादमधून अभय कुशवाह हे नवे चेहरे उतरवले होते. हे दोघे वगळता सर्वच नव्या चेहऱ्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

यावेळी लालू यादव यांनी आपली कन्या रोहिणी आचार्य यांना सारणमधून उमेदवारी दिली होती. भाजपचे राजीव प्रताप रुडी यांनी त्यांचा १३,६६१ मतांनी पराभव केला. त्याचप्रमाणे नवादामधून यादव जातीचा उमेदवार उभा करण्याऐवजी आरजेडीने श्रावण कुशवाह या तरुणाला उमेदवारी दिली. भाजपचे उमेदवार विवेक ठाकूर यांनी  कुशवाह यांचा पराभव केला. सुपौल मतदारसंघात आरजेडीचे चंद्रहास चौपाल, शिवहरमध्ये आरजेडीच्या रितू जैस्वाल अर्चना रविदास यांना जमुई येथून पराभव स्विकारावा लागला. आरजेडीने सीमावर्ती भागातील नेते तस्लिमुद्दीन यांच्या धाकट्या मुलाला अररिया लोकसभेतून उमेदवारी दिली होते. येथेही भाजपचे प्रदीप कुमार सिंह यांनी त्यांचा पराभव केला. 

या उमेदवारांचाही पराभवआरजेडीच्या कुमार सर्वजीत यांना गया लोकसभेत ‘हम’ पक्षाचे उमेदवार माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. आरजेडीने बाहुबली अशोक महतो यांची पत्नी अनिता कुमारी यांना मुंगेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, परंतु जेडीयूच्या लालन सिंह यांनी त्यांचा पराभव केला. मधेपुरामधून आरजेडीच्या प्रा. कुमार चंद्रदीप यांचा जेडीयूचे उमेदवार दिनेश चंद्र यादव यांनी १,७४,५३४ मतांनी पराभव केला.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४bihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४Rashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव