शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Lok Sabha Election Result 2024 : केवळ 0.7 टक्के मते कमी पडली आणि भाजपच्या खात्यातून 63 जागा वजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 09:14 IST

Lok Sabha Election Result 2024 : १.७३ टक्के मतांच्या फरकाने काँग्रेसला मिळाल्या दुप्पट जागा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळालेले नाही. त्यामागची मतांची आकडेवारी आता समोर येत आहे. निवडणुकीतील मतमोजणीच्या अंतिम आकडेवारीनुसार, केवळ ०.७ टक्के लोकप्रिय मतांची टक्केवारी घटल्याने भाजपचा ६३ जागांवर पराभव झाला. यामुळे भाजपला २७२ हा जादुई आकडा गाठता आला नाही. भाजपने २०१४ मधील २८२ जागांवरील कामगिरी सुधारत २०१९च्या निवडणुकीत ३०३ जागा जिंकल्या होत्या.

दुसरीकडे काँग्रेसच्या मतांची टक्केवारी केवळ १.७ टक्के वाढल्याने २०१९च्या तुलनेत दुप्पट म्हणजेच ९९ जागा मिळाल्या आहेत. हाच फॉर्म्युला वापरून बिहारमध्ये चिराग पासवान यांच्या एलजेपी-आरव्हीने केवळ ०.४४ टक्के मतांच्या टक्केवारीसह ५ जागा ताब्यात घेतल्या आहेत. मात्र बसपाने २.०४ टक्के मते मिळवूनही एकही जागा जिंकू शकली नाही.

काँग्रेसची कामगिरी सुधारलीभाजपशी थेट मुकाबला करत काँग्रेसने २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत २०१४च्या लोकसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी केली आहे.२०१९ मध्ये भाजपच्या तुलनेत केवळ ७.९ टक्के जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने २०२४च्या तुलनेत २८.९ टक्के जागांवर विजय मिळविला आहे.मात्र काँग्रेस अद्यापही २००९ च्या निवडणूक स्तरावर पोहोचलेली नाही. तेव्हा काँग्रेसने भाजपमध्ये अधिक मते मिळविली होती.२००९ मध्ये भाजपशी थेट लढत असलेल्या १७३ जागांपैकी काँग्रेसने ९३ आणि भाजपने ८० जागा जिंकल्या होत्या.

लोकसभा निवडणूक २०१९     मतांची टक्केवारी    जागाभाजप    ३७.३०%    ३०३ काँग्रेस    १९.४६%    ५२ लोकसभा निवडणूक २०२४     मतांची टक्केवारी    जागा    अंतरभाजप    ३६.५६%    २४०    -०.७%            (६३ जागा कमी)काँग्रेस    २१.१९    ९९      १.७३%            (४७ जागांत वाढ)

यावेळी इतर प्रमुख पक्षांना मिळालेली मतांची टक्केवारी

    सपा    ४.५८%    टीएमसी    ४.३७%    डीएमके    १.८२%    जदयू    १.२५    टीडीपी    १.९८%    उद्धवसेना    १.४८%    शिंदेसेना    १.१५%    आप    १.११%    शरद पवार गट    ०.९२%    एलजेपी-आरव्ही    ०.४४%

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल