लोकसभेसाठी राहुल गांधींचा केरळला 'बाय-बाय'? वायनाड नव्हे, 'या' ठिकाणाहून लढण्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 12:20 AM2024-02-27T00:20:46+5:302024-02-27T00:21:19+5:30

सध्या तरी राहुल यांच्यासाठी दोन मतदारसंघांची नावे पुढे येत आहेत

lok-sabha-election-2024-will-congress-leader-rahul-gandhi-not-contest-election-from-wayanad-lok-sabha-seat-in-kerala-see-details | लोकसभेसाठी राहुल गांधींचा केरळला 'बाय-बाय'? वायनाड नव्हे, 'या' ठिकाणाहून लढण्याची चर्चा

लोकसभेसाठी राहुल गांधींचा केरळला 'बाय-बाय'? वायनाड नव्हे, 'या' ठिकाणाहून लढण्याची चर्चा

Rahul Gandhi Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यावेळी केरळला बाय-बाय करू शकतात. केरळमध्ये, एलडीएफने राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघातून तसेच शशी थरूर यांच्या तिरुवनंतपुरम मतदारसंघातून उमेदवारांची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी यावेळी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे मानले जात आहे. यापूर्वीही राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढणार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे आता राहुल कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार यावर विविध चर्चा होताना दिसत आहेत. त्यात दोन नावे पुढे येत आहेत.

राहुल गांधी कुठून लढवणार निवडणूक?

राहुल गांधी तेलंगणासह यूपीच्या रायबरेली किंवा अमेठीतून निवडणूक लढवू शकतात, असे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मात्र, काँग्रेसकडून याबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. अमेठीत स्मृती इराणी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनीही काहीही बोललेले नाहीत. इंडिया आघाडीचा भाग असलेल्या सीपीआय (एम) ने केरळमधील चार जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे या चौघांमध्ये राहुल गांधींच्या वायनाड आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या तिरुअनंतपुरमच्या जागेचाही समावेश आहे.

सीपीआयने वायनाड मतदारसंघातून पक्षाचे सरचिटणीस डी राजा यांच्या पत्नी सीपीआय नेत्या ॲनी राजा यांना उमेदवारी दिली आहे. केरळमधील जागावाटपाबाबत इंडिया आघाडीचा अद्याप कोणताही समझोता झालेला नाही. या दरम्यान, एका घटकाने उमेदवार जाहीर केल्याने इंडिया आघाडीतही फूट पडल्याच्या चर्चा आहेत. तसेच, ही काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी डाव्या पक्षांनी केलेली रणनीती असल्याचे राजकीय जाणकार सांगताना दिसत आहेत. इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या दबावामुळे गांधी वायनाड मतदारसंघ सोडण्याचा विचार करत असल्याचे वृत्त न्यूज 18 ने दिले होते. आता राहुल गांधी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

Web Title: lok-sabha-election-2024-will-congress-leader-rahul-gandhi-not-contest-election-from-wayanad-lok-sabha-seat-in-kerala-see-details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.