शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

‘आज मंडीमध्ये…’, काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची कंगनावर आक्षेपार्ह पोस्ट, नंतर दिलं स्पष्टीकरण, मिळालं असं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 6:50 PM

Supriya Sreenet's Offensive Post On Kangana Ranaut: भाजपाने कंगनाला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघामधून कंगना राणावत हिला उमेदवारी जाहीर केली आहे. (lok sabha election 2024) मात्र कंगनाला उमेदवारी जाहीर होताच काही वाद विवादांनाही तोंड फुटलं आहे. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी कंगनाबाबत केलेली एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू होत्या. दरम्यान, भाजपाने कंगनाला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघामधून कंगना राणावत हिला उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र कंगनाला उमेदवारी जाहीर होताच काही वाद विवादांनाही तोंड फुटलं आहे. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी कंगनाबाबत केलेली एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी कंगनाबाबत अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं आहे. ‘आज मंडी मे क्या भाव चल रहा है?’ असा प्रश्न विचारणारी पोस्ट सुप्रिया श्रीनेत यांनी कंगना राणावतचा फोटो लावून सोशल मीडियावर शेअर केली होती. मात्र आपली चूक लक्षात येताच त्यांनी ही पोष्ट डिलीट केली. तसेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचा अॅक्सेस असलेल्या व्यक्तीने हे कृत्य केल्याचा दावा सुप्रिया श्रीनेत यांनी केला आहे. मात्र आता या प्रकारावरून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला असून, मंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कंगना राणावत हिनेही सुप्रिया श्रीनेत यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

भाजपाच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कंगना राणावत यांच्याबाबत सुप्रिया श्रीनेत यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आक्षेपार्ह उल्लेख असणारी पोस्ट शेअर झाल्यानंतर खळबळ उडाली होती.  ‘आज मंडी मे क्या भाव चल रहा है?’ असा उल्लेख आणि कंगना राणावतचा फोटो त्या पोस्टमध्ये होता. नंतर ही पोस्ट तातडीने डिलीट करण्यात आली. या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले की, माझ्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटचा अॅक्सेस असलेल्या कुणीतरी व्यक्तीने अत्यंत आक्षेपार्ह अशी पोस्ट शेअर केली आहे. ती नंतर डिलीट करण्यात आली आहे. मी कुठल्याही स्त्रीबाबत असं काही  लिहिणार नाही हे मला ओळखणाऱ्यांना माहिती आहे. तसेच माझ्या नावाचा गैरवापर करून विडंबन करणारे @Supriyaparody नावाचे एक एक्स खाते सुरू आहे. त्यामधून या गैर प्रकाराला सुरुवात झाली असून, आम्ही त्याबाबत तक्रार दाखल करत आहोत, असे सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले. 

दरम्यान, सुप्रिया श्रीनेत यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून करण्यात आलेल्या या आक्षेपार्ह पोस्टला कंगना राणावत हिनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  त्यामध्ये कंगना राणावत म्हणाली की, प्रिय सुप्रियाजी मागच्या २० वर्षांच्या माझ्या कारकिर्दीमध्ये मी एक कलाकार म्हणून विविध प्रकारच्या स्त्री भूमिका साकारल्या आहेत. क्वीनमधील ग्रामीण मुलीपासून ते धाकडमधील महिला गुप्तहेरापर्यंतच्या भूमिकांसा समावेश आहे. आपण आपल्या मुलींना पूर्वग्रहांमधून मुक्त केले पाहिजे. तसेच शरीराच्या अवयवांबात असलेल्या त्यांच्या कुतुहलाचं निराकरण केलं पाहिजे. तसेच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचं आव्हानात्मक जीवन आणि परिस्थितीचा अपमान करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. प्रत्येक महिला ही सन्मानास पात्र आहे, असे कंगना राणावत हिने सांगितले.  

 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाcongressकाँग्रेसmandi-pcमंडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४himachal pradesh lok sabha election 2024हिमाचल प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४