शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

'फिर एक बार, मोदी सरकार'साठी मोदी-शहांना सापडला जबरदस्त जादुगार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 11:42 AM

२०१४च्या निवडणुकीनंतर मोदींपासून दुरावलेला जुना-जाणता शिलेदार पुन्हा भाजपाच्या गोटात दाखल झाल्यानं त्यांना मोठंच बळ मिळाल्याचं बोललं जातंय.

नवी दिल्लीः अनेक राज्यांमध्ये असलेली सरकारविरोधी लाट (अँटी-इन्कम्बन्सी), विरोधकांमध्ये वाहू लागलेले एकीचे वारे आणि 'मित्रपक्षांमधील नाराजीचा सूर यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचं 'मिशन २०१९' कठीण झाल्याचं चित्र असतानाच, या जोडगोळीला एक चाणाक्ष जादुगार सापडल्याचं समजतं. किंबहुना, २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यापासून दुरावलेला जुना-जाणता शिलेदार पुन्हा भाजपाच्या गोटात दाखल झाल्यानं त्यांना मोठंच बळ मिळाल्याचं बोललं जातंय. हा जादुगार दुसरा-तिसरा कुणी नाही, तर निवडणूक रणनीतीचा बादशहा प्रशांत किशोर आहे. 

निवडणूक जिंकणं ही एक कला आहे आणि प्रशांत किशोर यांनी त्यातील 'मास्टरी' सिद्ध केली आहे. भारतीय मतदारांची नाडी त्यांनी अचूक ओळखलीय. त्यामुळे २०१२ची गुजरात विधानसभा निवडणूक असो किंवा देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी २०१४ची लोकसभा निवडणूक; प्रशांत किशोर यांनी चमत्कार करून दाखवला होता. भाजपाच्या या ऐतिहासिक विजयानंतर, अमित शहा आणि त्यांचं काहीतरी बिनसलं होतं. त्यामुळेच बिहार विधानसभेच्या निवडणुकीत, त्यांनी मोदी-शहांऐवजी नितीश-लालूंसाठी रणनीती आखली होती आणि त्यांना सत्तेपर्यंतही पोहोचवलं होतं. पंजाबमध्ये त्यांनी काँग्रेसचं विजयाचं स्वप्न साकार केलं होतं. अर्थात, काही निवडणुकांमध्ये हा राजकीय चाणक्य काहीसा अपयशीही ठरला, पण आता नव्या जोमाने तो 'घरवापसी'साठी सज्ज असल्याचं कळतंय.

गेल्या काही महिन्यात प्रशांत किशोर आणि पंतप्रधान मोदी यांची अनेकदा भेट झालीय. या भेटी ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ चालल्याचं पक्षातील खास व्यक्तीनं सांगितलं. या बैठकांमध्ये, येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची आखणी झाल्याचं समजतं. इतकंच नव्हे तर, अमित शहा आणि प्रशांत किशोर यांच्यातील मतभेदही मिटल्याची चिन्हं आहेत. कारण, या दोघांच्याही बऱ्याच बैठका झाल्याचं सांगितलं जातंय. तरुणांना पक्षासोबत जोडण्यासाठी पूर्ण ताकद लावल्यास विजयाचा मार्ग सुकर होईल, अशी सूचना प्रशांत किशोर यांनी केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं. 

दुसरीकडे, प्रशांत किशोर यांच्या I-PAC या संघटनेनं तरुणांची भरती सुरू केली आहे. #NationalAgendaForum हा हॅशटॅग प्रत्येक ट्विटसोबत जोडला जातोय. महात्मा गांधींच्या विचारांचा आधार घेऊन ते तरुणांना जोडण्याची मोहीम राबवत ठळकपणे जाणवतंय. त्यातून प्रशांत किशोर यांची चलाखी सहज लक्षात येऊ शकते. त्यामुळेच मोदी-शहा थोडे निश्चिंत होणार आहेत.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपाPrashant Kishoreप्रशांत किशोर