शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
3
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
4
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
6
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
7
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
8
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
9
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
10
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
11
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
12
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
13
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
15
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
16
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
17
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
18
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
19
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

पीएम केअर्स फंडावरून लोकसभेत गदारोळ; अधीर रंजन यांची अनुराग ठाकूर याच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 18:46 IST

अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या एका वक्तव्याने या संपूर्ण गदारोळाला सुरुवात झाली. ते सभागृहात पीएम केअर्स फंडचा हिशेब देत होते. यावेळी त्यांनी गांधी कुटुंबाचा उल्लेख करत, ज्यांना पीएम राष्ट्रीय मदत निधीतून लाभ मिळाला, त्यांची नावे जाहीर करण्याची धमकी दिली होती.

ठळक मुद्देविरोधक विरोधासाठी विरोध करत आहेत. पीएम केअर्स फंड का योग्य नाही, हे त्यांनी सांगावे - ठाकूरयावेळी टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभा सभापतींवर भाजपा सदस्यांचा बचाव करत असल्याचा आरोपही केला. गदारोळ अधिक वाढल्याने लोकसभा सभापती ओम बिरला यांनी लोकसभेचे कामकाज अर्ध्यातासासाठी स्थगित केले होते.  

नवी दिल्ली - पीएम केअर्स फडावरून आज लोकसभेत गदारोळ झाला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याचदरम्यान काँग्रेस खासदार आधीर रंजन चौधरी यांनी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे गदारोळ अधिक वाढल्याने लोकसभा सभापती ओम बिरला यांनी लोकसभेचे कामकाज अर्ध्यातासासाठी स्थगित केले होते.  

अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या एका वक्तव्याने या संपूर्ण गदारोळाला सुरुवात झाली. ते सभागृहात पीएम केअर्स फंडचा हिशेब देत होते. यावेळी त्यांनी गांधी कुटुंबाचा उल्लेख करत, ज्यांना पीएम राष्ट्रीय मदत निधीतून लाभ मिळाला, त्यांची नावे जाहीर करण्याची धमकी दिली. यानंतर विरोधी पक्षातील खासदारांनी त्यांच्या या वक्तव्याला तीव्र विरोध केला. यावेळी टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभा सभापतींवर भाजपा सदस्यांचा बचाव करत असल्याचा आरोपही केला. कल्याण बॅनर्जी म्हणाले, सभापती सातत्याने विरोधकांना रोखत आहेत. एवढेच नाही, तर सभापतींनी आपल्याला निलंबित केले तरी चालेल. मात्र, आता आपण हे सहन करणार नाही. यावर अधीर रंजन चौधरी यांनीही कल्याण बॅनर्जी यांचे समर्थन केले. नवनिर्वाचित सदस्यही लोकसभा विरोधकांसाठी असभ्य भाषा वापरत आहेत, असा आरोप आधीर रंजन यांनी केला. ओम बिरला यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

पीएम केअर्स फंडचा हिशेब देत होते अनुराग ठाकूर - यावेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, पीएम केअर्स फंडला विरोधक केवळ विरोध करत आहेत. त्यांनी त्यांच्या विरोधाचे कारण स्पष्ट करावे. मात्र, ते तसे न करता केवळ विरोधासाठी विरोधच करत आहेत. पीएम केअर्स फंड का योग्य नाही, हे त्यांनी सांगावे. यांना नोटाबंदी, जीएसटी, तीन तलाक सर्वच अयोग्य वाटते. पीएम केअर्स फंडावर सर्वोच्च न्यायालयानेही आपला निर्णय दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

SBI मधून पैसे काढण्याची पद्धत बदलली, ग्राहकांना होणार फायदा

भारत-चीन तणावातच रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यंचा पंतप्रधान मोदींना फोन, 'या' विषयावर झाली चर्चा

"झोपेत घोरत असाल तर सावधान! कोरोनामुळे मृत्यूचा तिप्पट धोका"

PAK-चीनच्या संपत्तीतून 1 लाख कोटी कमावण्याच्या तयारीत मोदी सरकार, लवकरच आणणार कायदा!

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपाParliamentसंसद