शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown News: ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशनबाबत केंद्र सरकारचा मोठा दिलासा, 31 जुलैपर्यंत वाढवली वैधता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 12:03 IST

देशात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनांची कागदपत्रे, पीयूसीसारख्या कागदपत्रांची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली – देशात कोरोनाचं संकट वाढत असल्याने लॉकडाऊनदेखील वाढवण्यात आलं आहे. गेल्या २ महिन्यापासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. अनेक सरकारी कार्यालये बंद असल्याने लोकांची कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत. ३१ मे पर्यंत देशात लॉकडाऊन असणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

देशात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनांची कागदपत्रे, पीयूसीसारख्या कागदपत्रांची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचसोबत १ फेब्रुवारीपासून ज्या लोकांचे वाहन परवाने, कागदपत्रे नुतनीकरणाविना रखडले आहेत त्यांना कोणताही वाढीव दंड आकारणार नसल्याचं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याबाबत केंद्र सरकारने रविवारी सूचना दिल्या आहेत.

अलीकडेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयातून ३० जून २०२० पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे या कागदपत्रांचे नुतनीकरण अशक्य असल्याने मोटार वाहन अधिनियम १९८८ आणि  मोटार वाहन अधिनियम १९८९ नुसार ही मुदत वाढविण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे देशातील शासकीय परिवहन कार्यालये बंद झाल्यामुळे केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ३२ आणि ८१ च्या आदेशानुसार नागरिकांना विविध शुल्काबाबत / अतिरिक्त शुल्काबाबत अडचणींना तोंड द्यावं लागत आहे म्हणून सरकारने ३१ जुलैपर्यंत ही मुदतवाढ दिली आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

केंद्रीय रेल्वेमंत्री आणि राज्य सरकार वाद शिगेला; रात्री २ वाजता ट्विट करत पियूष गोयल म्हणाले...

उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय; स्थलांतरित कामगारांना परत बोलवायचं असेल तर...

कोरोनावरील लस सर्वप्रथम कोणाला मिळणार?; केंद्र सरकारने आखला ‘असा’ प्लॅन!

जाणून घ्या, ४८ तासांनंतर बदलणार अमेरिकेचा इतिहास; नासा पुन्हा सुरु करणार ‘मानव मिशन’! 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारRto officeआरटीओ ऑफीसcorona virusकोरोना वायरस बातम्या