शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मशिदीसाठी जमीन अयोध्या पंचक्रोशीबाहेर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 04:21 IST

मुस्लिमांना पाच एकर जमीन देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी ही जमीन अयोध्या पंचक्रोशीच्या बाहेरच दिली जाऊ शकेल, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

अयोध्या : बाबरी मशीद बेकायदेशीरपणे पाडली गेल्याने झालेल्या अन्यायाचे परिमार्जन म्हणून नवी पर्यायी मशीद बांधण्यासाठी मुस्लिमांना पाच एकर जमीन देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी ही जमीन अयोध्या पंचक्रोशीच्या बाहेरच दिली जाऊ शकेल, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.सूत्रांनी सांगितले की, मशिदीसाठी अयोध्येत मोक्याची जागा द्यावी, असे न्यायालयाने म्हटले असले तरी ती पूर्वीच्या मशिदीहून किती अंतरावर असावी याचा त्यात नेमका उल्लेख नाही. त्यामुळे या जागेचा निर्णय शहरातील सध्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊनच करावा लागेल.एरवीही अयोध्या शहर गजबजलेल्या लोकवस्तीचे आहे. त्यातच आता अयोध्या हे नव्याने स्थापन झालेल्या जिल्ह्याचे मुख्यालय झाले आहे. त्यामुळे शहराच्या पूर्वीच्या पालिका हद्दीत सलग पाच एकर जमीन उपलब्ध करून देणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे अयोध्या पंचक्रोशीच्या बाहेर अयोध्या फैजाबाद रस्त्यावर अशी एखादी जागा उपलब्ध होऊ शकेल.राममंदिरासाठी आंदोलन करणाऱ्यांचे मुस्लिमांना मशिदीसाठी पर्यायी जागा द्यावी, असे न्यायालयाचा निकाल होण्याआधीही म्हणणे होते. मात्र, ही जागा ‘शास्त्रीय परिधी’च्या म्हणजे १५ किमीच्या परिक्रमा मार्गाच्या बाहेर असावी, अशी त्यांची अट होती. सूत्रांनी सांगितले की, यातील हिंदूंच्या श्रद्धेचा भाग बाजूला ठेवला तरी वास्तविक अपरिहार्यता म्हणूनही मशिदीची जागा खरोखरच पंचक्रोशीच्या बाहेरच द्यावी लोगल, असे दिसते.सम्राट बाबराच्या आदेशावरून ज्याने बाबरी मशीद बांधली होती त्या मीर बकी या त्याच्या सेनापतीचे कब्रस्तान शाहजनवा गावात आहे. नव्या मशिदीसाठी या गावात जागा द्यावी, असेही काहींनी सुचविले आहे; पण हे गावही अयोध्येच्या पंचक्रोशीतच आहे. (वृत्तसंस्था)>सुन्नी वक्फ बोर्डाचा निर्णय २६ च्या बैठकीत अपेक्षितन्यायालयाच्या निर्णयानुसार मशिदीसाठी दिली जाणारी जमीन मुळात स्वीकारायची का? स्वीकारायची झाल्यास त्यासाठी अटी कोणत्या असाव्यात व त्या जागेवर मशिदीसोबत अन्य काय बांधायचे, याविषयी सुन्नी वक्फ बोर्डाचा निर्णय येत्या २६ नोव्हेंबर रोजी होणे अपेक्षित आहे.बोर्डाचे अध्यक्ष जफर फारुखी यांनी सांगितले की, आधी बोर्डाची बैठक १३ तारखेला व्हायची होती; पण आता ती २६ रोजी होईल. जमीन घ्यावी आणि घेऊ नये, अशी दोन्ही बाजूंची मते बोर्डाकडे व्यक्त केली आहेत. बैठकीत त्यावर साधक-बाधक विचार करून निर्णय घेतला जाईल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर