शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

GalwanValley Clash: चीनची पोलखोल, इंटरनेटवर सापडला 15 जूनला मारल्या गेलेल्या सैनिकाच्या कबरीचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 21:48 IST

भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये 15 जूनला हिंसक झटापट झाली होती. यात भारताच्या 20 जवानांना होतात्म्य आले होते. तर चीनचेही 35 ते 40 जवान मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता.

ठळक मुद्देभारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये 15 जूनला हिंसक झटापट झाली होती. यात भारताच्या 20 जवानांना होतात्म्य आले होते.या चकमकीत चीनचेही 35 ते 40 जवान मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता.

पेइचिंग -भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये 15 जूनला हिंसक झटापट झाली होती. यात भारताच्या 20 जवानांना होतात्म्य आले होते. तर चीनचेही 35 ते 40 जवान मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. एवढेच नाही, तर घटनास्थळी चिनी हेलिकॉप्टरदेखील दिसून आले होते. हे हेलिकॉप्टर जखमी आणि मृत सैनिकांना घेऊन जात असल्याचेही बोलले गेले होते. मात्र, चीनने हा दावा फेटाळला होता. 

यातच आता, इंटरनेटवर एक फोटो शेअर होत असून, यात गलवान खोऱ्यात मारल्या गेलेल्या चिनी सैनिकाची कबर दिसत असल्याचा दावा चीन प्रकरणाच्या एका एक्सपर्टने केला आहे,  

फोटोत सैनिकाची पूर्ण माहिती -चिनी प्रकरणाचे अभ्यासक एम. टेलर फ्रॅवल यांनी दावा केला आहे, की चीनची मायक्रोब्लॉगिंग साइट Weibo वर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. यात दिसत असलेली कबर एका 19 वर्षीय चिनी सैनिकाची आहे. या सैनिकाचा मृत्यू, भारत आणि चीनी सैनिकांत झालेल्या हिंसक झटापटीत झाला आहे.  हा सैनिक फुजियान प्रांतातील अल्याचा दावा केला जात आहे. टेलर यांनी असेही म्हटले आहे, की या फोटोत दिसत असलेल्या कबरीच्या फोटोत या सैनिकाच्या यूनिटचे नाव 69316 असल्याचे सांगण्यात आले आहे. ही गलवानच्या उत्तरेला असलेल्या चिप-चाप खोऱ्यात तियानवेन्दियनची सीमा संरक्षण कंपनी असल्याचा अंदाज आहे.

टेलर यांनी दुसऱ्या सूत्राच्या हवाल्याने लिहिले आहे, की हा सैनिक 13व्या सीमा संरक्षण रेजिमेंटचा भाग आहे. त्यांनी असाही दावा केला आहे की 2015मध्ये या युनिटचे नाव केंद्रीय सैन्य आयोगाने 'युनायटेड कॉम्बॅट मॉडेल कंपनी' असे ठेवले होते. तसेच, यावरून चीनने गलवान खोऱ्यात कोणती युनिट तैनात केली होती, हेही समजते, असेही टेलर यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

अंधारी रात्र, जबरदस्त पाऊस अन् गोळ्यांचा वर्षाव; आजच्याच दिवशी भारतानं हाजीपीरवर रोवला होता तिरंगा

कर्नाटकात पुन्हा वाद पेटला, रात्रीतूनच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्नांचा पुतळा

मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण

आता अमेरिकेतील शाळा-महाविद्यालयांत पसरला कोरोना, हजारो विद्यार्थ्यांसह शिक्षकही क्वारंटाइन

खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

टॅग्स :ladakhलडाखchinaचीनIndiaभारतIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिक