कर्नाटकात पुन्हा वाद पेटला, रात्रीतूनच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्नांचा पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 11:26 AM2020-08-28T11:26:09+5:302020-08-28T11:42:44+5:30

कन्नड संघटनांनी रात्री 3 वाजता रायन्ना यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर बसवला. संगोळी रायान्ना हे कित्तूर साम्राज्यातील सेनाप्रमुख होते. 

Karnataka statue of rayanna placed in front of the shivaji maharaj statue in belgaum | कर्नाटकात पुन्हा वाद पेटला, रात्रीतूनच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्नांचा पुतळा

कर्नाटकात पुन्हा वाद पेटला, रात्रीतूनच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्नांचा पुतळा

googlenewsNext
ठळक मुद्देकन्नड संघटनांनी रात्री 3 वाजता रायन्ना यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर बसवला. संगोळी रायान्ना हे कित्तूर साम्राज्यातील सेनाप्रमुख होते.  रायन्ना यांच्या पुतळ्याला मराठी भाषिकांचा तीव्र विरोध आहे.

बेळगाव - येथे पुन्हा एकदा पुतळ्यावरून वाद पेटला आहे. येथील पिरणवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच संगोळी रायान्ना यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. यामुळे येथील मराठी भाषिक रस्त्यावर उतरले आहेत. रायन्ना यांच्या पुतळ्याला मराठी भाषिकांचा तीव्र विरोध आहे. हा पुतळा इतर ठिकाणी हलवावा अशी मागणी मराठी भाषिक करत आहेत.

कन्नड संघटनांनी रात्री 3 वाजता रायन्ना यांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर बसवला. संगोळी रायान्ना हे कित्तूर साम्राज्यातील सेनाप्रमुख होते. 

या पार्श्वभूमीवर पिरनवाडी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यापूर्वी कर्नाटकातीलबेळगावमधील मनगुत्ती गावात पोलिसांनी रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने वाद पेटला होता. मनगुत्ती येथील आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जदेखील केला होता.

मनगुत्ती ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावानुसार येथील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांसह राणी चन्नम्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी वाल्मिकी या महापुरुषांचे समान उंचीचे पुतळे उभारण्याचे ठरले आहे. त्यानुसार गावातील काही युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तेथे उभारला होता. मात्र एका गटाच्या युवकांनी त्यास विरोध करत पुतळा काढण्यासाठी दबाव सुरू केला. राज्य सरकारच्या आदेशानंतर हा पुतळा  काढण्यात आला होता. 

यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. राज्य सरकारनेही या प्रकरणाची दखल घेत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांना पत्र लिहिले होते. सीमाभागाचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पत्र पाठवून घडलेल्या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त केला होता.

महत्त्वाच्या बातम्या -

मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण

आता अमेरिकेतील शाळा-महाविद्यालयांत पसरला कोरोना, हजारो विद्यार्थ्यांसह शिक्षकही क्वारंटाइन

खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

CoronaVirus : कोरोनापासून बचावासाठी जगभरात लागू आहे 'हा' नियम, वैज्ञानिकांनीच उपस्थित केले गंभीर प्रश्न

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात

Web Title: Karnataka statue of rayanna placed in front of the shivaji maharaj statue in belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.