Lokmat Money > बिझनेस न्यूज > खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

सध्या मोटारसायकल, मोपेड आणि सायकलसारख्या वाहनांवर 28 टक्के जीएसटी लावला जातो. दुचाक्यांवरील जीएसटीसंदर्भातील या संभाव्य सुधारणेच्या वृत्ताचे भारतातील मोटार वाहन उद्योगांनी स्वागत केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 08:11 PM2020-08-26T20:11:54+5:302020-08-26T20:17:30+5:30

सध्या मोटारसायकल, मोपेड आणि सायकलसारख्या वाहनांवर 28 टक्के जीएसटी लावला जातो. दुचाक्यांवरील जीएसटीसंदर्भातील या संभाव्य सुधारणेच्या वृत्ताचे भारतातील मोटार वाहन उद्योगांनी स्वागत केले आहे.

GST on two wheelers may be reduce soon finance minister nirmala sitharaman hints | खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

Highlights सध्या मोटारसायकल, मोपेड आणि सायकलसारख्या वाहनांवर 28 टक्के जीएसटी लावला जातो.अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एका उद्योगाशी बोलताना म्हटले आहे, की दुचाकींवरील जीएसटी दरात सुधारणा करण्यात येत आहे.GST काउंसिलच्या 19 सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हे भाष्य केले आहे.

नवी दिल्ली - भारतात जवळपास सर्वच लोक दुचाकीचा वापर करतात. मात्र, सध्या या गाड्यांवरील जीएसटीचा दर लक्झरिअस गाड्यांप्रमाणेच आहे. पण आता यावर सरकारकडून लवकरच मोठा निर्णय घेतला जाणार आहे. नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एका उद्योगाशी बोलताना म्हटले आहे, की दुचाही लक्झरिअस गोष्ट नही. तसेच तिच्यापासून काही नुकसानही नाही. यामुळे यांच्यावरील जीएसटी दरात सुधारणा करण्यात येत आहे.

सध्या मोटारसायकल, मोपेड आणि सायकलसारख्या वाहनांवर 28 टक्के जीएसटी लावला जातो. दुचाक्यांवरील जीएसटीसंदर्भातील या संभाव्य सुधारणेच्या वृत्ताचे भारतातील मोटार वाहन उद्योगांनी स्वागत केले आहे. मात्र, असे मानले जाते, की दुचाकींवर आकारला जाणारा कर लवकरच कमी होईल. गेल्या वर्षी देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पने सरकारकडे दुचाकी वाहनांवर लावला जाणारा  जीएसटी कमी करण्यावर विचार करण्यात यावा, असा आग्रह धरला होता. यात 150सीसीच्या दुचाकीवर 18 टक्के स्लॅबसंदर्भात बोलण्यात आले होते.

AMRG आणि Associates Senior Partner रजत मोहन म्हणाले, "मोटारसायकल, मोपेड आणि छोटी मोटर असलेल्या सायकलसारख्या दुचाकी सर्वाधिक GST म्हणजेच 28 टक्क्यांत मोडतात. दुचाकी ही देशातील हजारो कुटुंबीयांची प्राथमिक गरज आहे. यांना सिगारेट, तम्बाखू, पिस्तुल आणि रेसिंग कार यांच्या सारखाच जीएसटी आकारला जातो."

GST काउंसिलच्या 19 सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हे भाष्य केले आहे. यामुळे, या बैठकीत दुचाकींवरील GST संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. असे झाल्यास सणासुदीच्या दिवसांतच दुचाकींच्या विक्रित मोठी वाढ होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : कोरोनापासून बचावासाठी जगभरात लागू आहे 'हा' नियम, वैज्ञानिकांनीच उपस्थित केले गंभीर प्रश्न

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात

ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

Web Title: GST on two wheelers may be reduce soon finance minister nirmala sitharaman hints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.