शहरं
Join us  
Trending Stories
1
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
4
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
7
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
8
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
9
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
10
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
11
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
12
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
13
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
14
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
15
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
16
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
17
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
20
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे कुमार विश्वास गोत्यात

By admin | Updated: May 4, 2015 14:51 IST

आपच्या महिला कार्यकर्त्याने तक्रार केल्यावर दिल्लीच्या महिला आयोगाने डॉ. कुमार विश्वास यांना समन्स बजावल्याने आपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ४ - आम आदमी पक्षाचा डोक्याचा ताप आणखी वाढला असून पक्षाचे नेते डॉ. कुमार विश्वास यांच्याविरोधात पक्षाच्या महिला कार्यकर्त्याने तक्रार केल्यानंतर दिल्लीच्या महिला आयोगाने विश्वास यांना समन्स बजावले आहे. विश्वास यांना मंगळवारी महिला आयोगासमोर हजर राहून त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर मला बदनाम करण्याचा हा कट आहे असा दावा कुमार विश्वास यांनी केला आहे. 
आपच्या महिला कार्यकर्त्याने काही दिवसांपूर्वी महिला आयोगाकडे धाव घेतली होती. कुमार विश्वास यांच्यासोबत संबंध असल्याची अफवा पसरवण्यात आल्याने माझे लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. आता कुमार विश्वास यांनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडावी असे या महिलेचे म्हणणे होते. या महिलेच्या तक्रारीची महिला आयोगाने दखल घेतली आहे. महिला आयोगाने कुमार विश्वास व त्यांच्या पत्नीला समन्स बजावत मंगळवारी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान अमेठीतील आपच्या महिला कार्यकर्त्याचे कुमार विश्वास यांनी शोषण केल्याचा आरोप केला जात आहे. पण संबंधीत महिलेनेच या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. 
कुमार विश्वास यांनी या प्रकरणासाठी भाजपाला जबाबदार ठरवले आहे. मला बदनाम करण्यासाठी काही लोकं घाणेरडे राजकारण करत आहेत असे विश्वास यांनी म्हटले आहे.