शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोविड-१९ रुग्ण मृत्यू दर एक टक्क्याच्या खाली आणा -अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 05:44 IST

शहा यांनी मुख्यमंत्र्यांना कंटेनमेंट झोन्स अधिक सक्षम करण्याचे पाऊल उचलण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी जी माहिती गोळा करण्यात आली त्या आधारे दर आठवड्याला रेड झोन्सला भेट द्यावी

कोविड-१९ रुग्ण मृत्युचा दर हा एक टक्क्याच्या खाली असावा आणि नवे रुग्ण होण्याचे प्रमाण पाच टक्क्यांच्या वर नसावे यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केली. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांची व्हर्च्युअल बैठक घेतली. त्यात शहा यांनी ही सूचना केली.

शहा यांनी मुख्यमंत्र्यांना कंटेनमेंट झोन्स अधिक सक्षम करण्याचे पाऊल उचलण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी जी माहिती गोळा करण्यात आली त्या आधारे दर आठवड्याला रेड झोन्सला भेट द्यावी, विशिष्ट भागाचा दर्जा बदलावा, असे सांगितले. सध्या दर १५ दिवसांनी कंटेनमेंट झोन्समधील माहिती गोळा केली जात आहे. शहा म्हणाले की, सर्व तीनही लक्ष्ये लवकरात लवकर गाठली जातील यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रयत्न करावेत.

फायझरच्या लसीची गरज पडणार नाही- डॉ. हर्षवर्धन

n    कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात इतर लसींच्या घेतल्या जात असलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष आश्वासक असल्यामुळे भारताला फायझरच्या लसीची कदाचित गरज पडणार नाही, असा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला.n    डॉ. हर्षवर्धन म्हणाले, फायझर-बायोटेकच्या लसीला अमेरिकेच्या नियामक प्राधिकरणनेही अजून मान्यता दिलेली नसल्यामुळे तिचा विचार करण्याचे काही कारणच नाही.

n    समजा अमेरिकेची त्या लसीला मान्यता मिळाली तरी तिची उत्पादक कंपनी इतर देशांना ती पुरवण्याच्या आधी लोकांना ती उपलब्ध करून देईल.n    सध्या भारतात कोविड-१९ वर उपाय म्हणून किमान पाच लसींच्या मानवावर चाचण्या केल्या जात असून त्यापैकी तीन लसी या सुरक्षितता आणि सामर्थ्य सिद्ध करणाऱ्या दोन-तीन क्लिनिकल चाचण्यांच्या पायऱ्यांवर आहेत, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाcorona virusकोरोना वायरस बातम्या