कोथरुड कचरा डेपोला आग
By admin | Updated: July 12, 2015 23:56 IST
वारजे : कोथरुड येथील कचरा डेपोला रविवारी सायंकाळी साडेसात वाजता आग लागली. अग्निशमक दलाच्या नऊ टँकरने आग विझविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
कोथरुड कचरा डेपोला आग
वारजे : कोथरुड येथील कचरा डेपोला रविवारी सायंकाळी साडेसात वाजता आग लागली. अग्निशमक दलाच्या नऊ टँकरने आग विझविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. कोथरुड कचरा डेपो परिसरात उद्यान विभागाने झाडांच्या तोडलेल्या फांदया टाकल्या होत्या. लोकमान्य झोपडपी परिसरातील सीमाभिंत तुटलेली आहे. या भागातून कोणीतरी आग लावल्याचा संशय व्यकत केला जात आहे. रात्री उशिरापर्यंत अग्निशमक दलाच्या ९ गाड्याद्वारे आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होती. परंतु, आग अद्याप विझविण्यात पूर्णता यश आलेले नाही, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य निरीक्षक गणेश खिरीड यांनी दिली. ------------------------फोटो : हणमंत लॉगीनमध्ये कोथरुड आग नावाने सेव्ह