शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

कोदामेंढी...

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

जि. प. सदस्यांनी घेतले तोंडली गाव दत्तक

जि. प. सदस्यांनी घेतले तोंडली गाव दत्तक
कोदामेंढी : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून परिसरातील तोंडली गट ग्रामपंचायत दत्तक घेऊन शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचा मानस जिल्हा परिषद सदस्या शकंुतला हटवार यांनी व्यक्त केला.
तीर्थक्षेत्र सुकळी येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी तोंडली गाव दत्तक घेतल्याची घोषणा केली. याप्रसंगी सरपंच अर्चना बुरडे, उपसरपंच जनार्दन बांते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रूपचंद बांते, ग्रामपंचायत सदस्य राजेश मेश्राम, सीताराम बांडेबुचे, शुभम मेश्राम, अंकुश बुरडे, कविता आस्वले यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. सार्वजनिक शौचालयाकरिता दोन लाख रुपये, भूमिगत नाल्यांसाठी एक लाख तसेच प्रत्येक घरी शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी प्रति शौचालय १२ हजार रुपये शासनाकडून दिले जाणार असल्याचे हटवार यांनी सांगितले. अन्य विकास कामात तीर्थक्षेत्र विकास योजनेत हनुमान मंदिर परिसरातील कामे, शाळेची नवीन इमारत व शेतकऱ्यांना धान्य साठवून तारण कर्जाच्या योजनेसाठी गोदामची योजना राबविण्याचा संकल्प यावेळी जाहीर करण्यात आला.
ग्रामपंचायत सचिव विकास सहारे यांनी शौचालयाची कामे तातडीने करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. तोंडली गट ग्रामपंचायत अंतर्गत खिडकी व सुकळी या गावांचाही समावेश आहे. ही गावे भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असून विकासपासून वंचित राहिलेली आहेत. ही गावे दत्तक घेतल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. प्रसंगी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. (वार्ताहर)