शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

शांती भूषण यांच्याकडून किरण बेदींचे कौतुक

By admin | Updated: January 22, 2015 12:59 IST

प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते शांतीभूषण यांनी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचे कौतुक केल्याने आपमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते शांतीभूषण यांनी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचे कौतुक केल्याने आपमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. किरण बेदी या केजरीवालांइतक्याच चांगल्या असून त्यांना उमेदवारी देणे हा भाजपाचा मास्टरस्ट्रोक होता, मात्र त्या आपच्या उमेदवार राहिल्या असत्या तर आपल्याला आनंद झाला असता असे ते म्हणाले. 
अवघ्या काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या किरण बेदी यांची भाजपाने मुख्यमंत्रीपदाची उमेदवार म्हणून घोषणा केली होती. तर आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी धडाक्यात प्रचार सुरू केला. निवडणुकीदरम्यान  केजरीवाल वि. बेदी असा सामना रंगलेला असतानाच 'आप'चेच ज्येष्ठ नेता असलेल्या शांती भूषण यांच्या या वक्तव्यामुळे पक्षात खळबळ माजली आहे. 
बेदी या धर्मनिरपेक्ष व प्रामाणिक असून उत्तम प्रशासक आहेत. त्या दिल्लीला नक्कीच भ्रष्टाचारमुक्त सरकार देतील अशा शब्दांत शांती भूषण यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच इंडिया अगेन्स्ट करप्शन मोहिमेतही त्यांचे मोठे योगदान होते त्यामुळे आंदोलनातील एखाद्या व्यक्तीस मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी मिळाल्याबद्दल अण्णा हजारेंना आनंद व्हायला हवा असेही ते म्हणाले.