शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

उरीमध्ये दहा दहशतवादयांचा खात्मा, एक जवान शहीद

By admin | Updated: September 20, 2016 18:19 IST

भारतीय सैनिकांनी तात्काळ चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये १० दहशतवादयांचा खात्मा केला आहे. तर एक भारतीय जवान शहिद झाला आहे.

ऑनलाइन लोकमतश्रीनगर,दि.२० : काश्मीर खोऱ्यात प्रत्यक्ष सीमारेषेपासून जवळच असलेल्या उरी शहरातील भारतीय लष्कराच्या एका तळात घुसून आत्मघाती सशस्त्र दहशतवादयांनी रविवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. या हल्याला दोन दिवस झाले नाहीत तोवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उलघंन केलं आहे. भारतीय पोस्टवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला असून जवळपास २० राउडं फायरींग करण्यात आल्या आहेत. 

भारतीय सैनिकांनी तात्काळ चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये १० दहशतवादयांचा खात्मा केला आहे. तर एक भारतीय जवान शहीद झाला आहे. गोळीबाराच्या आडून दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी आणखी पाच ते सहा दहशतवादी दडून बसले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरुच आहे.  

उरी येथे लष्कराच्या तळावर झालेल्या दशतवादी हल्ल्याचा संपूर्ण जगातून निषेध होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने पुन्हा एकदा ना'पाक' कुरापती केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी भारताकडून प्रयत्न करण्यात येऊ लागले आहेत. पाकिस्तानकडून दहशतवादाला घातले जाणारे खतपाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर उघड करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.