मुकुंद नगरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

By Admin | Updated: July 29, 2015 00:42 IST2015-07-29T00:42:21+5:302015-07-29T00:42:21+5:30

सोलापूर : भवानी पेठेतील मुकुंद नगरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली.

Kidnapping of minor girl from Mukund Nagar | मुकुंद नगरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

मुकुंद नगरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

लापूर : भवानी पेठेतील मुकुंद नगरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली.
अल्पवयीन मुलगी ही आईसमवेत जवळच असलेल्या शिवगंगा मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन आटोपून निघताना एका अनोळखी मुलाने तिचे अपहरण केले. शोधाशोध करूनही मुलीचा शोध काही लागला नाही. अपहरण झालेल्या मुलीच्या आईने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून, अनोळखी मुलावर भादंवि कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक बनसोडे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Kidnapping of minor girl from Mukund Nagar